पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात कोणत्या शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करायचे, हे आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील ठरविणार आहेत. पालकमंत्र्यांच्या पूर्वपरवानगीनेच जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे परिपत्रक जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी काढले असून जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागप्रमुख, कार्यालयप्रमुखांना त्याबाबत कळविण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या निधीमधून ज्या कामांची उद्घाटने ,भूमिपूजन अथवा तत्सम कार्यक्रम आयोजित करायचे असतील, तर पालकमंत्र्यांच्या कार्यालयाची पूर्वपरवानगी घेऊनच कार्यक्रम आयोजित करावे लागणार आहेत. त्यातून भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांचे कार्यक्रम थांबविले जाण्याची शक्यता आहे, अशी चर्चा या परिपत्रकामुळे सुरू झाली आहे.

जिल्ह्यात शासकीय कार्यक्रमासाठी पालकमंत्री यांना आमंत्रित करावे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्री यांचे नाव योग्य प्रकारे छापण्यात यावे. कार्यक्रमावेळी त्यांना आदराचे स्थान देऊन त्यांची व्यासपीठावरील बैठक व्यवस्था राजशिष्टाचाराप्रमाणे करण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व केंद्रीय मंत्री, जिल्ह्यातील मंत्री यांनाही पूर्वसूचना देऊन आमंत्रित करण्यात यावे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन ते कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे की नाही, याची खातरजमा करूनच त्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत छापण्यात यावीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ
scam in milk supply
दूध आणि पोषण आहार पुरवठ्यात कोट्यवधींचा घोटाळा; आमदार रोहित पवार यांचा आरोप
farmers loan subsidies stalled due to indifference of co operative department officials auditors says hasan mushrif
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान सहकार खात्याचे अधिकारी, लेखापरीक्षकांच्या उदासीनतेमुळे रखडले – हसन मुश्रीफ

हेही वाचा: दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात ३० टक्क्यांनी वाढ? राज्य मंडळ तोटय़ात असल्याने प्रस्ताव

जिल्ह्यातील कोणताही शासकीय कार्यक्रम घेण्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. त्यांनी मान्यता दिल्यानंतरच कार्यक्रमाचे नियोजन त्या संबंधित विभागाकडून होणार आहे. परवानगी नसताना कार्यक्रमाचे आयोजन झाल्यास संबंधित विभागाने कोणतीही कार्यवाही करू नये आणि अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: पुणे: वारजेमध्ये सराईत गुन्हेगाराकडून गोळीबार

राज्यात सत्तांतरानंतर पुण्याचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे आले आहे. महाविकास आघाडी सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पालकमंत्री होते. चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे पाटील विद्यमान आमदार आहेत.