केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याच्या चर्चांवर चंद्रकांत पाटलांनी सोडलं मौन; म्हणाले “पाटील काय चीज आहे…”

“…तर मग काय करायचं? त्याला मी समर्थ आहे” असं देखील पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्लीत गेले होते. त्यानंतर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आणि पक्षश्रेष्ठी हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कामकाजावर नाराज असून, भाजपात संघटनात्मक फेरबदल होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आज पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, यावेळी त्यांनी जे अशाप्रकारच्या चर्चा करतात “त्या सूत्रांचं हिंमत असेल तर नाव सांगा, त्यांना हे माहिती नाही की पाटील काय चीज आहे.” असं देखील बोलून दाखवलं.

तुम्ही दिल्लीला गेलात की लगेच सूत्र अपप्रचार सुरू करतात, असं माध्यम प्रतिनिधींनी म्हटल्यावर यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “ते सूत्र मला शोधून दिलं तर तुम्हाला जेवायला देतो.” यावर, तुमच्याच पक्षातील आहेत सूत्र, तुम्ही दिल्लीला जायचं नाव घेतलं की इकडे चर्चा सुरू होते, असं माध्यम प्रतिनिधींकडून सांगण्यात आल्यावर, “हे बघा आमच्या पक्षातील आहे की बाहेरच्या पक्षातील आहेत माहिती नाही, त्यांना हे माहीत नाही की पाटील काय चीज आहे. घाबरणार नाही.” असं चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.
तर, या अगोदर माध्यमांनी जेव्हा चंद्रकांत पाटील यांना तुमच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची माहिती समोर येत आहे, असं सांगितलं. तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणाले की, “तुम्हाला दिल्लीवाले भेटले? सूत्रांची माहिती असेल तर ते सूत्र एकदा प्रकट करा ना. मला या विषयावर काही बोलायचं नाही. कारण, तुमचं मत काय आहे यावर मी काम करत नाही. माझ्या श्रेष्ठींचं माझ्याबद्दल काय मत आहे, आणि त्या मतामध्ये त्यांनी काही म्हटलं तर मग काय करायचं? त्याला मी समर्थ आहे. ४२ वर्षे आहेत, काही कमी वर्षे आहेत का? त्यामुळे मला, सूत्र… हिंमत असेल तर नाव सांगा.”

महाविकासआघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण ; चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा, म्हणाले…

तसेच, “अमित शाह आणि मी गप्पा मारत बसलेल्या फोटोतील बॉडलॅग्वेज तरी पत्रकार म्हणून तुम्हाला कळाली पाहिजे. ते बसलेत निवांत, मी बसलो आहे. त्यांची बॉडीलॅग्वेज ते महाराष्ट्रातील विरोधी पक्ष म्हणून आम्ही जे खंबीरपणे काम करतोय त्यावर समाधानी आहेत. फोटो पुन्हा काढून दाखवू का? मी ज्या प्रकारे बसलोय, ते ज्या प्रकारे बसलोय आम्ही हास्य विनोद करतोय. अलीकडे ही नवीन पद्धत झाली का? की हास्यविनोद करता करता, असंतोष व्यक्त करण्याची.” असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chandrakant patil leaves silence on discussions that the central leadership is unhappy msr

Next Story
VIDEO: बुधवार चौकात होता दुसऱ्या बाजीरावांचा बुधवार वाडा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी