पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत कसब्यातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच, पोट निवडणुकीसाठी भाजपकडून रणनीतीही निश्चित केली जाणार आहे. या बैठकीमुळे निवडणुकीच्या घडामोडींना वेग मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – …आणि उघडला शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा!

हेही वाचा – पुणे : सावकाराच्या जाचामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, भोर तालुक्यातील घटना

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पोटनिवडणूक बिनविरोध न करण्याची भूमिका भाजप विरोधकांनी घेतली आहे. पोटनिवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबात भाजप नेतृत्वापुढे मोठे आव्हान आहे. माजी सभागृहनेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, खासदार गिरीश बापट यांची स्नुषा स्वरदा यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत असतानाच दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांनीही उमेदवारीवर हक्क सांगितला आहे. टिळक कुटुंबीयांपैकी एकाचा विचार निवडणुकीसाठी व्हावा, अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. निवडणुकीसाठीच्या उमेदवाराच्या नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाईल, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil meeting with bjp leaders over kasba by election candidate pune print news apk 13 ssb
First published on: 23-01-2023 at 11:36 IST