बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे कंगना पुन्हा एकदा वादात सापडली असून तिच्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका केली जात आहे. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती खरं स्वातंत्र्य तर २०१४ सालामध्ये मिळालं आहे या कंगनाच्या वक्तव्यार बॉलिवूड सेलिब्रिटीसंह अनेक नेत्यांनी देखील निशाणा साधला आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
कंगना रणौत यांच्या भावना काय आहेत. त्या मला माहिती नाहीत, पण त्यांच वाक्य पूर्णपणे चुकीचे आहे. अशा प्रकारे देशाच्या स्वातंत्र्यावर निगेटिव्ह टिप्पणी करणे, याची कोणालाही परवानगी नाही. पण २०१४ मध्ये नेरेंद्र मोदी आल्यापासून जो काही स्वातंत्र्याचा अनुभव मिळत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व सामान्यांना दोन वेळेच जेवण मिळत नाही, असा एकही माणूस दिसत नाही. १०५ रुपयात ३५ किलो धान्य, घरे, टॉयलेट अशी मोठी कामांची यादी आहे. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा अनुभव, २०१४ पासून लोकांना मिळायला लागल्याच विधान हे मोदीजींच्या कामावर खुश होऊन म्हणणे योग्य आहे. पण १९४७ मधील स्वातंत्र्यावर त्यांना (कंगनाला) टीका करण्याचा अधिकार नसल्याची भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.




पुण्यातील एसपी महाविद्यालयात एका कार्यक्रमाकरिता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कंगना रणौतच्या वादग्रस्त विधानाबाबत विचारले होते.
एसटी कामगारांच्या संपावर चंद्रकांत पाटील म्हणाले
एसटी कामगारांच्या संपावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवणार सरकार असल्याचे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेची किती काळजी घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या काळात कधी लोकांनी आंदोलन केली. कधी संप केले?,असे कधी झालेच नाही. याच कारण यांना नेमकं रयतेच्या मनातील कळायचे. या सरकारमध्ये इतका निर्दयपणे आहे की ३७ आत्महत्या झाल्या आहेत.”
राज ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. उद्यापासून सर्व सुरळीत होऊ शकते. याबाबत क्रेडिट भाजपाला मिळू नये,अशी चर्चा आहे. त्यावर पाटील म्हणाले की, “आम्हाला क्रेडिटच काहीच पडलेलं नाही. एसटी कर्मचार्यांना न्याय मिळाला पाहिजे. कोणाच्याही कोंबड्याने का होय ना, तो कोंबडा आरू देत आणि सूर्योदय होऊ दे.”