विद्यमान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक पुण्यातील कोथरुड मतदारसंघामधून का लढवली यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पुणे भाजपाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये जाहीर भाषणात हा मतदारसंघ माझ्यासाठी निवडण्यामागे दिल्लीतील नेतृत्वाचा हात होता असं पाटील यांनी म्हटलं आहे. इतकच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत त्यांच्याच पुढाकाराने या मतदारसंघातून मी निवडणूक लढल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”; जाहीर भाषणात चंद्रकांत पाटलांचं विधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्यानंतर शहर आणि जिल्ह्यासाठी काय काय नियोजन आहे यासंदर्भातील माहिती पाटील यांनी भाषणात दिल्यानंतर २०१९ ला कोथरुडमधून लढण्यावरुन झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. “२०१९ ला मला पुण्यातून उमेदवारी दिली तेव्हा बरेच जण काय काय म्हणाले. त्यावेळेला मला कोणीतरी म्हणालं की तुमच्या आतमध्ये काही खदखद आहे का? मी म्हटलं आतमध्ये काही नाही, पडलं की झोपतो,” असं पाटील म्हणताच एकच हशा पिकला. “लोक काय काय म्हणतात. यामध्ये पत्रकार, कार्यकर्ते सगळेच आले. बाहेरचा आला, बाहेरचा आला असं म्हटलं गेलं. सगळं हास्यास्पद आहे. याकडे मी खेळी म्हणूनच बघतो. हा सगळा गेम आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांची काळजी करु नका,” असा सल्लाही पाटील यांनी विरोधकांना दिला.

नक्की वाचा >> शिंदेंनी दर्शन न घेतल्याने देवीचं विसर्जन थांबवलं: मनसेचा मंडळाला इशारा; “देवापेक्षा CM मोठे झाले का? विसर्जन करा अन्यथा…”

दिल्लीमधून आपल्याला पुण्यातून तिकीट देण्याचं निश्चित झाल्यांचही पाटील यांनी सांगितलं. “या सगळ्या टीकेनंतर माझ्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या आल्या. दिल्लीमध्ये बसलेत ते काय विचार करणारे नाहीत का? २०१९ ला काय उचललं मला आणि आणलं पुण्याला असं झालं नाही. यामागे काहीतरी नियोजन असणार. करोनामुळे आणि सरकार गेल्याने हे नियोजन अर्धवट राहिलं आहे. ते पूर्ण करायचं आहे,” असंही पाटील यांनी भाषणात म्हटलं. प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या नेतृत्वाखाली लढवलेल्या निवडणुकींमध्ये अनेकांना धूळ चारल्याचा उल्लेख पाटील यांनी केला. “कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर साफ झालं. माढ्यात पवार उभे राहणार होते. काय झालं? नाही उभे राहिले. रणजित निंबाळकर विजयी झाले. ८४ हजार मतांनी जिंकले,” अशी आठवणही पाटील यांनी करुन दिली.

नक्की पाहा >> Photos: भाषणादरम्यान चिठ्ठी आली अन्… नातवाबद्दल उद्धव ठाकरेंचं ‘ते’ विधान पाहून CM शिंदे संतापून म्हणाले, “तुमचा मुलगा…”

तसेच आपल्याला आता पुण्यामध्ये जबाबदारी दिल्याचा संदर्भ देत, “हे जे सुरु झालंय ते आता पुणे, बारामती वगैरे करायचं आहे ना. २०१९ ला मला मिशन दिलं गेलं. या वयात मला आणि माझ्या कुटुंबालाही डिस्टर्ब करायला लागलं. अनेकांना असं वाटतं की काय मज्जा आहे बाबा यांची, यांना कोथरुडची जागा मिळाली. अरे यातना माहिती आहेत का? इथून २०० किलोमीटर कोल्हापूर आहे. १६ दिवसांतून मी घरी जातो. माझी आई, पत्नी आणि तिची आई जी ८२ वर्षांची आहे असा चौघांचा संसार आहे,” असंही पाटील म्हणाले.

नक्की वाचा >> Dasara Melava: “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप

तसेच कोल्हापूरमधून की कसाही निवडून आलो असतो पण मला अमित शाह यांनी पुण्यातून उभं राहण्यास सांगितल्याचं पाटील म्हणाले. “मला कुठे निवडून येता येत नव्हतं का? चार मतदारसंघ कोल्हापूरमध्ये असे होते जिथे चंद्रकांत पाटील उभा राहिला तर निवडून आलाच असता. पण अमितभाई (अमित शाह) म्हणाले मला आधी सर्वेक्षण करु द्या. त्यांनी सर्वेक्षण केलं मग फोन आला. म्हणाले, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे पण तुम्हाला पुणे मिळणार. निवडून येईल हे मान्य करावं लागेल असं मी त्यांना म्हटलं. त्यावर अमित भाईंनी चला पुण्याला उडी तर मारु असं विधान केलं,” अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘फिरायला नेतो’ सांगून परराज्यातील कामगारांना पुण्यातून CM शिंदेंच्या मेळाव्याला आणलं; म्हणे, “राज ठाकरेंच्या…”

मात्र या साऱ्या घडामोडीमधून लोकांनी चुकीचा अर्थ घेतल्याची खंत पाटील यांनी बोलून दाखवली. तसेच पुण्यातून दिलेली संधी म्हणजे “मला मिशन दिलं होतं. पुणे शहर, जिल्हा ताब्यात घ्यायचा आहे. एक एक जागा लढवायची आहे,” असंही पाटील म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil says kothrud seat was given by delhi leadership in 2019 maharashtra vidhansabha election amit shah called me scsg
First published on: 07-10-2022 at 12:42 IST