scorecardresearch

ग. दि. माडगूळकर स्मारकाचे काम एका वर्षात पूर्ण करा, पालकमंत्री चंद्रकात पाटिलांच्या पुणे महापालिका प्रशासनाला सूचना

थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे काम एका वर्षात पूर्ण करावे, त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा प्रकिया सुरू करावी, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

ग. दि. माडगूळकर स्मारकाचे काम एका वर्षात पूर्ण करा, पालकमंत्री चंद्रकात पाटिलांच्या पुणे महापालिका प्रशासनाला सूचना
लोकसत्ता टीम

पुणे : महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेले थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे काम एका वर्षात पूर्ण करावे, त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा प्रकिया सुरू करावी, असे आदेश पालकमंत्री तथा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ग.दि. माडगूळकर यांच्या नियोजित स्मारकाला भेट देवून महापालिका अधिकाऱ्यांकडून स्मारकाच्या कामाबाबत माहिती घेतली. महानगरपालिकेचे अतिरिक्त (विशेष) आयुक्त विकास ढाकणे, अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा – मराठी शाळेत शिकून कुणाचे नुकसान होत नाही, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांचे मत

पाटील म्हणाले, ग.दि. माडगूळकर स्मारकाच्या मूळ इमारतीचे काम आधी पूर्ण करणे आवश्यक आहे. सुरू असलेल्या प्रदर्शन केंद्राच्या कामासोबत स्मारकाचे कामही सुरू करावे आणि पुढील वर्षाच्या गुढी पाडव्यापर्यंत ते पूर्ण करावे. कामासाठी चांगली क्षमता असलेल्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात यावी. काम पूर्ण करण्यासाठी त्याला प्रोत्साहनात्मक सुविधा देण्यात याव्यात. स्मारकाच्या आतील सजावटीचा आराखडा तयार करताना गदिमांच्या कुटुंबीयांशी चर्चा करावी. तसेच, पुढील आठवड्यात त्याचे सादरीकरण करण्यात यावे. गदिमांच्या कार्याला साजेसे असे स्मारक उभे राहील, याकडे विशेष लक्ष द्यावे.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी स्मारकाच्या कामाबाबत माहिती दिली. कोथरूडमध्ये तीन मजली भव्य स्मारक उभारण्यात येणार असून बांधकामाचे क्षेत्रफळ ३ हजार २३०.७८ चौरस मीटर एवढे असणार आहे. पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर पाच विविध दालने आणि दुसऱ्या मजल्यावर प्रायोगिक रंगभूमीसाठी नाट्यगृह नियोजित आहे. प्रदर्शन केंद्राच्या (एक्झिबिशन सेंटर) स्वंतत्र इमारतीचे क्षेत्रफळ ८ हजार ५८०.३२ चौरस मीटर असून त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 17:59 IST

संबंधित बातम्या