scorecardresearch

‘टोमणे मारण्याऐवजी तोंड बंद ठेवावे’; चंद्रशेखर बावनकुळे यांची संजय राऊत यांच्यावर टीका

संजय राऊत यांच्यावर कारागृहाच्या भाषेचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे कारागृहाचा प्रभाव असलेली भाषा त्यांनी थांबविली पाहिजे, अशी टीका बावनकुळेंनी केली आहे.

‘टोमणे मारण्याऐवजी तोंड बंद ठेवावे’; चंद्रशेखर बावनकुळे यांची संजय राऊत यांच्यावर टीका
चंद्रशेखर बावनकुळे यांची संजय राऊत यांच्यावर टीका (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स)

दररोज सकाळी टोमणे मारण्याऐवजी त्यांनी तोंड बंद ठेवावे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. शिंदे-फडणवीस यांचे सरकार फेब्रुवारी महिन्यात कोसळेल, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. यासंदर्भात बानकुळे यांना विचारले असता त्यांनी ही टीका केली. संजय राऊत यांच्यावर कारागृहाच्या भाषेचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे कारागृहाचा प्रभाव असलेली भाषा त्यांनी थांबविली पाहिजे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा- पुणे : शस्त्रक्रिया करताना गरम पाणी सांडल्याने ज्येष्ठ नागरिक जखमी, खासगी रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबरच माझ्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदारांनी शिवसेनेला सोडचिट्ठी देऊ नये यासाठी त्यांना धीर देण्यासाठी सरकार कोसळण्याची भाषा संजय राऊत वापरत आहेत. ते जगातील विद्यमान व्यक्ती आहेत. मात्र लोकांना टोमणे आवडत नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन विकासासाठी काम केले पाहिजे, अशी लोकांची अपेक्षा आहे.

हेही वाचा- करोना आटोक्यात, पारदेशवारीला पसंती; पुण्यात गेल्या वर्षभरात तीन लाख ४४ हजार पारपत्रांचे वितरण

अजित पवार पदावर असताना कसे वागत होते, हे त्यांनी तपासून पहावे. पूर्वइतिहास तपासावा. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, बारा आमदारांचे निलंबन याचा विचार त्यांनी करावा, असा टोलाही बावनकुळे यांनी अजित पवार यांना लगाविला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 22:38 IST

संबंधित बातम्या