scorecardresearch

“काँग्रेस, राष्ट्रवादीला मत देणे म्हणजे विकास थांबवणे”, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल; म्हणाले, “दोन्ही पक्षांनी..”

बावनकुळे हे आज दिवसभर पिंपरी- चिंचवड शहरात असून, भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

Chandrashekhar Bawankule on Congress
चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

पुणे : ”काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला मत देणे म्हणजे विकास थांबवणे. दोन्ही पक्षांनी केवळ स्वतःसाठी मतांचे राजकारण केले आहे. देशाच्या विकासाठी त्यांनी कधीच राजकारण केले नाही, त्यांना विचारधारा नाही. भाजपाची विचारधारा पक्की असून, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा आहे”, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते चिंचवड मतदारसंघातील बैठकीत बोलत होते. बावनकुळे हे आज दिवसभर पिंपरी- चिंचवड शहरात असून, भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्र आणि राज्यशासनाच्या योजना चिंचवडमध्ये आणणारी ही पोटनिवडणूक आहे. महाराष्ट्रात डबल इंजिनचे सरकार आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहेत. ते चांगले काम करत आहेत. महाराष्ट्रात दिलासादायक बजेट येईल, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारेंविरुद्ध बलात्काराचा गुन्हा, पुण्यातील शासकीय विश्रामगृहात महिलेवर अत्याचार

हेही वाचा – पुणे : पुसाणे गाव होणार लोडशेडिंगमुक्त! दैनंदिन गरजांसाठी सोलर सिस्टीमद्वारे मिळणाऱ्या विजेचा होणार वापर

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मत देणे म्हणजे विकास थांबवणे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मतांसाठी राजकारण केले आहे. त्यांनी देश, विकास आणि समृद्धीसाठी कधीच राजकारण केले नाही. कारण त्यांच्याकडे विचारधारा नाही. भाजपाकडे पक्की विचारधारा आहे. हिंदुत्वाच्या विचारावर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचे आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड मतदारसंघातील कामे दिवंगत लक्ष्मण जगताप हे करत होते. आज ते आपल्यात नसल्याने आता उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप या त्यांचे स्वप्न पूर्ण करतील. त्यासाठी त्यांना विजयी करा, असे आवाहन बावनकुळे यांनी नागरिकांना केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 13:51 IST
ताज्या बातम्या