पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले आहे. आदिवासी लोकांना त्यांच्या जमिनीचा पट्टा मिळाला नाही, त्यांना पट्टा दिला जाणार आहे. १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर वसलेल्यांना मालकी हक्क आणि मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) दिले जाणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
महसूलमंत्री बावनकुळे गुरुवारी आमदार शंकर जगताप, अमित गोरखे, महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, नगरसेवक राहुल कलाटे यांच्या घरी भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले. तत्पूर्वी बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘सेवा संकल्प अभियाना’ला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. जनतेला विकसित भारताच्या संकल्पासोबत पुढे जायचे आहे. ज्या आदिवासी लोकांना त्यांच्या जमिनीचा पट्टा मिळालेला नाही. त्यांना पट्टा देऊन मालकी हक्क आणि मालमत्ता पत्रक दिले जाणार आहे. एक जानेवारी २०११ पूर्वी जे लोक शासकीय जमिनीवर वसले आहेत, त्यांनाही महसूल विभागामार्फत मालकी हक्क आणि मालमत्ता पत्रक देण्यात येणार आहे.
भटक्या-विमुक्त समाजात ५३ जमाती आहेत. या जमातींकडे दुर्लक्ष झाले होते. महायुती सरकारने सर्वांत जास्त लक्ष भटक्या समाजावर, पारधी समाजावर दिले आहे. हे लोक कुठेही राहतात, फिरतात. त्यांना घर देणे आणि त्यांना सक्षम करणे, ही भूमिका आम्ही या सेवा संकल्प अभियानात घेतली आहे. याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांबरोबर बैठका झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
‘यूपीआय’ व्यवहार सर्वसामान्यांना मोफत
सर्वसामान्य ग्राहकांसाठी ‘यूपीआय’ व्यवहार पूर्णपणे मोफत आहेत. शुल्क लावल्याचा गैरसमज निर्माण केला जात आहे. दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर आणि सामान्य लोकांवर कोणतेही शुल्क लावण्यात आलेले नाही. बाजाराची परिस्थिती पाच पटीने वाढली आहे. अशा वेळी डिजिटल सेवांचा भारही वाढतो. नवीन विदा केंद्र (डेटा सेंटर्स) आणि नवीन व्यवस्था तयार होत आहेत. सरकारचे याकडे लक्ष असून, निश्चितपणे गरीब माणसावर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरेंचे दिशा सालियानप्रकरणी ट्विट, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे युवासेनाप्रमुख, माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियानप्रकरणी ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे. अफवांचा धुरळा उडवणे बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो! असा उल्लेख करित त्यांनी ट्विट केले आहे. त्यावर आता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महसूलमंत्री बावनकुळे गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान प्रकरणी जे ट्विट केले आहे. त्याबाबत काय सांगाल असे विचारते असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी मग ते आदित्य ठाकरे यांनाच विचारा असे हसत सांगत अधिक भाष्य करणे टाळले.
