पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (१४ जून) पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर देहू संस्थान आणि पोलीस विभागामार्फत जय्यत तयारी करण्यात आले आहे. त्याच दरम्यान देहू संस्थानकडून पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांना तुकोबांची पगडी आणि उपरणे तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार तुकाराम पगडी तयार करण्यात आली. मात्र, त्या पगडीवर समोरच्या बाजूला मध्यभागी लिहिण्यात आलेली ओवी नंतर बदलण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधी या पगडीवर ।। भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी ॥ ही तुकाराम महाराजांची ओवी लिहिण्यात आली होती. आता या पगडीवरील ओवी बदलण्यात आली असून त्यावर ॥ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ॥ ही ओवी लिहिण्यात आली आहे. आता हीच पगडी उद्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात येणार आहे.

हेही वाचा : मोदींच्या सुरक्षेसाठी २००० पोलीस! देहूला छावणीचं स्वरुप; १० पोलीस उपायुक्त, १० साहाय्यक आयुक्तांच्या खांद्यावर जबाबदारी

या पगडीवरील ।। भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी ॥ या पगडीवरील ओव्या कोणत्या कारणास्तव बदलण्यात आल्या. या पगडीबाबत गिरीश मुरुडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. देहू संस्थानकडूनही यावर प्रतिक्रिया देणं टाळण्यात आलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in lines of poem of sant tukaram on pagadi for pm modi dehu pune svk 88 pbs
First published on: 13-06-2022 at 19:07 IST