पुणे : आजारी आजोबांचा पेहराव करून तोतयाकडून वडिलोपार्जित जमिनीची खरेदी | Cheated by purchasing ancestral land pune print news amy 95 | Loksatta

पुणे : आजारी आजोबांचा पेहराव करून तोतयाकडून वडिलोपार्जित जमिनीची खरेदी

नातवासह तिघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे : आजारी आजोबांचा पेहराव करून तोतयाकडून वडिलोपार्जित जमिनीची खरेदी
( संग्रहित छायचित्र )/ लोकसत्ता

आजारी असलेल्या आजोबांसारखा पेहराव करून दुसऱ्याचा एका व्यक्तीकडून साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र तयार करून घेत त्याद्वारे वडिलोपार्जित १४ गुंठे जमीन खरेदी केल्याप्रकरणी नातवासह आणखी दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला.जिल्हा सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी याबाबतचे आदेश दिले. नातू कुणाल सुनिल हरगुडे, शंतनू रोहिदास नरके, कृतिका किरण कहाणे अशी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आजोबा असल्याचे भासवणाऱ्या तोतया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शाेध घेण्यात येत आहे. याबाबत ४२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. २१ फेब्रुवारी २०२२ रोजी शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ही घटना घडली होती.

हेही वाचा >>> पुणे : पीएच.डी.बरोबरच दुसऱ्या पदवी अभ्यासक्रमास परवानगी नाही

या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी हरगुडे, नरके, कहाणे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जाला अतिरिक्त सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी विरोध केला. संबंधित गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आजोबा म्हणून भासवणाऱ्या तोतया व्यक्तीचा शोध घ्यायचा असून त्याला अटक करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी विनंती ॲड. घोरपडे यांनी युक्तीवादात केली. फिर्यादीकडून ॲड. तेजस पवार आणि ॲड. विक्रम घोरपडे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : पीएच.डी.बरोबरच दुसऱ्या पदवी अभ्यासक्रमास परवानगी नाही

संबंधित बातम्या

वसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का? पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण
‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’; नव्या वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत
पुणे : वर्तुळाकार रस्ता जानेवारीपासून मार्गावर; भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात
शहरात आज ३६६ केंद्रांवर लसीकरण; मुलांसाठी स्वतंत्र १७८ केंद्रे
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची शनिवारपासून तिकीटविक्री

व्हिडिओ

ताज्या बातम्या
FIFA WC 2022: ‘कबूतर नृत्य’! लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल
गाय नव्हे माय! निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिकवला धडा; पाहा घटनेचा थरारक Video
मुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक
ENG vs PAK 2nd Test: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ
“सत्तेचा पट सतत बदलत राहतो, खेळ संपल्यावर…”; सुषमा अंधारेंच विधान!