CA तरुणीची एका वेबसाईटवरून ओळख झालेल्या तरुणाने केली ११ लाखांची फसवणूक

एका वेबसाईटवर चार्टर्ड अकाउंटंट तरुणीची चेन्नई येथील तरुणाशी ओळख झाली होती

fraud-new
तरुणीने निगडी पोलिसात तक्रार दिली असून निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

विवाह संस्थेच्या एका वेबसाईटवर चार्टर्ड अकाउंटंट तरुणीची चेन्नई येथील तरुणाशी ओळख झाली. त्यांनी तीन महिने एकमेकांना प्रत्येक्षात न पाहता फोनवर संभाषण सुरू ठेवले. तरुणाने तरुणीचा विश्वास संपादन करून ११ लाखांची फसवणूक केल्याचं उघड झाल आहे. तसेच तरुणीला चेन्नई येथे बोलवून लग्नाच्या कागदपत्रांवर सह्या घेऊन लग्न झाल्याचं भासवले. त्यानंतर लग्नाचे खोटे प्रमाणपत्र तरुणीला पाठवले.

दरम्यान, व्यवसाय करण्यासाठी ८० लाख रुपये कर्ज तुझ्या नावावर काढून दे, असी मागणी आरोपीने केली. मात्र, तरुणीने नकार दिला. त्यानंतर आरोपीने तरुणीला आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा, हा सर्व प्रकार बोगस असल्याचं समोर आले. या प्रकरणी ३० वर्षीय तरुणीने निगडी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार, प्रेमराज थेवराज या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ही चार्टर्ड अकाऊंटंट असून आरोपी प्रेमराज याच्याशी  लग्न जुळवण्याच्या एका वेबसाटवरून ओळख झाली. दोघांनी मोबाईल क्रमांकाची देवाण-घेवाण केली. त्या दोघांमध्ये संभाषण सुरू झाले, दोघेही दोन ते तीन महिने एकमेकांना प्रत्यक्षात न भेटता फोनवरून बोलत होते. दरम्यान, आरोपी प्रेमराज याने तरुणीचा विश्वास संपादन केला. त्याने खोट बोलून पैश्यांची गरज असल्याचे पटवून सांगत तरुणीकडून तब्बल ११ लाख रुपये घेतले.

तक्रारदार तरुणीला चेन्नई येथे आरोपी प्रेमराज याने लग्न करण्यास बोलावले. तिथे दोघांची भेट झाली. लग्नाच्या फॉर्मवर सह्या घेतल्या त्यानंतर तक्रारदारास खोटे लग्नाचे प्रमाणपत्र पाठवून तू माझी पत्नी आहेस, असे सांगितले. तर, व्यवसायासाठी ८० लाख रुपये कर्ज तुझ्या नावावर घेऊन दे, असं आरोपी म्हणाला. त्यावर तरुणीने त्याला नकार दिला. तेव्हा, तक्रारदाराला आरोपीने आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीने निगडी पोलिसात तक्रार दिली असून निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत. अद्याप आरोपीला अटक केलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cheated rs 11 lakh chartered accountant girl pune meets a man on web site srk 94 kjp

ताज्या बातम्या