scorecardresearch

हिंदू समाजाची छगन भुजबळ यांनी माफी मागावी; भाजपची मागणी

सरस्वती देवीच्या प्रतिमा शाळेत कशासाठी, असे वादग्रस्त विधान भुजबळांनी केले होते. या विधानावरुन भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

हिंदू समाजाची छगन भुजबळ यांनी माफी मागावी; भाजपची मागणी
छगन भुजबळ

सरस्वती देवीच्या प्रतिमा शाळेत कशासाठी, असे विधान करून नवरात्रीच्या सणात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखाविल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी माफी न मागितल्यास भाजपच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.

हेही वाचा- प्राधिकरणाचे क्षेत्र महापालिकेत समाविष्ट करा; भाजपाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी मुळीक बोलत होते. सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, संदीप लोणकर, दत्ता खाडे, दीपक पोटे, प्रमोद कोंढरे, रवींद्र साळगावकर, सचिन मोरे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा- एकल महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ अभियान

सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते सैरभैर झाले आहेत. विकासकामांची कोणतीच दूरदृष्टी नसल्याने वैफल्यग्रस्त अवस्थेत काही मंडळी बेताल वक्तव्य करीत आहेत. हिंदुत्वाशी फारकत घेतलेल्या शिल्लक सेनेने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे या वेळी जगदीश मुळीक यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या