पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या बंद ;आंदोलनात छत्रपती संभाजीराजेचा सहभाग | Chhatrapati Sambhaji Raje participation in tomorrow shutdown in Pimpri Chinchwad pune print news bej 15 amy 95 | Loksatta

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या बंद ;आंदोलनात छत्रपती संभाजीराजेंचा सहभाग

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह बहुजन समाजाच्या महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी गुरुवारी (८ डिसेंबर) पिंपरी-चिंचवड शहर बंदचे आवाहन केले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या बंद ;आंदोलनात छत्रपती संभाजीराजेंचा सहभाग
छत्रपती युवराज संभाजीराजे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह बहुजन समाजाच्या महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी गुरुवारी (८ डिसेंबर) पिंपरी-चिंचवड शहर बंदचे आवाहन केले आहे. या आंदोलनात छत्रपती युवराज संभाजीराजे सहभागी होणार आहेत.

हेही वाचा >>>पुणे: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाची अधिसूचना १५ दिवसांत निघेल; माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची माहिती

गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहर बंदचे आवाहन करण्यात आले असून शहरातील सर्व नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलक सकाळी दहापासून ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत पिंपरी चौकात धरणे आंदोलन करणार आहेत. शहरातील विविध संस्थांचे कार्यकर्ते रॅलीद्वारे या ठिकाणी जमा होणार आहेत. दुपारी १२ वाजता छत्रपती संभाजीराजे आंदोलनात सहभागी होणार असून आंदोलकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती आंदोलनाचे समन्वयक मारुती भापकर यांनी पत्रकारांना दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 19:24 IST
Next Story
पिंपरी पोलिसांचा दरारा! तीन ठिकाणी हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपींना काही तासांतच पोलिसांनी ठोकल्या बेड्या