scorecardresearch

मुख्यमंत्र्यांची दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी भेट; राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भीमाशंकर येथे देवदर्शन केल्यानंतर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांची दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी भेट; राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा
मुख्यमंत्र्यांची दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी भेट; राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भीमाशंकर येथे देवदर्शन केल्यानंतर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ही भेट औपचारिक होती आणि त्यावेळी कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असा खुलासा दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात होण्यापूर्वीच वळसे यांनी खुलासा करताना सांगितले, की ही सदिच्छा भेट होती. मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात अनौपचारिक दौऱ्यावर आले असताना चहापानाच्या निमित्ताने त्यांनी निवासस्थानी येऊन ही भेट घेतली. आपण त्यांचे स्वागत करून पाहुणचार केला. यापलीकडे काहीही घडले नाही, असे वळसे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या