केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या अंतर्गत शहरासह जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि ग्रामीण भागातील दहा अशा एकूण २१ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक पाच लाख ६१ हजार ९८८ मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. दुसऱ्या क्रमांकावर शहरातील हडपसर असून या ठिकाणी पाच लाख २५ हजार १७४ मतदार आहेत. तर, कसबा विधानसभा मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त असून या ठिकाणी महिला मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पुणे : हडपसर भागात दहशत माजविणाऱ्या गुंडावर कारवाई; झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कोल्हापुरातील कारागृहात स्थानबद्ध

प्रारूप यादीवरील दावे व हरकती ८ डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत, तर २६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप मतदारयादीनुसार ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदार शिरूरमध्ये आहेत. शिरुरमध्ये चार लाख नऊ हजार ३२२ एवढे मतदार आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पुरंदर मतदारसंघ असून या ठिकाणी चार लाख सात हजार ८५७ मतदार आहेत. त्याखालोखाल भोरमध्ये तीन लाख ८९ हजार ६४१, मावळात तीन लाख ५७ हजार २९८, बारामतीमध्ये तीन लाख ५५ हजार १४७, खेडमध्ये तीन लाख २९ हजार ६४४, इंदापूरात तीन लाख १३ हजार १८४, जुन्नरमध्ये तीन लाख सहा हजार २५७, दौंडमध्ये तीन लाख चार हजार ४७२ आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी दोन लाख ९५ हजार ५९६ मतदार आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी चिंचवडमध्ये पाच लाख ६१ हजार ९८८, पिंपरीत तीन लाख ५५ हजार ७५८, तर भोसरी मतदारसंघात पाच लाख पाच हजार ८८५ मतदार आहेत, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा- पुणे : हमाल, तोलणारांच्या मागण्यांसाठी हमाल पंचायतीकडून उपोषण सुरू

मतदार म्हणून नाव कसे शोधाल?

मतदार यादीत नाव आहे किंवा कसे, हे http://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल उपयोजनवर (ॲप) संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदार संघ ही माहिती भरल्यानंतर समजेल. मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक सहा भरावा, पत्ता बदलण्यासाठी आठ-अ, तर नाव वगळणीसाठी सात क्रमांकाचा अर्ज भरावा, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा- पुणे : महापालिकेच्या विधी विभागाकडूनच नियमांचे उल्लंघन?- पॅनेलवरील वकिलांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव

शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील मतदार

शहरात सर्वाधिक पाच लाख २५ हजार १७४ मतदार हडपसरमध्ये आहेत. दुसऱ्या क्रमांकावर खडकवासला मतदारसंघ असून या ठिकाणी पाच लाख सहा हजार ५२१ मतदार आहेत. त्याखालोखाल वडगावशेरीमध्ये चार लाख २६ हजार ७९७, कोथरूडमध्ये तीन लाख ८५ हजार ७७, पर्वतीमध्ये तीन लाख २७ हजार ९२६, कसब्यात दोन लाख ७४ हजार ३७७, शिवाजीनगरमध्ये दोन लाख ७३ हजार ९३४ आणि सर्वात कमी दोन लाख ६५ हजार ९५ मतदार पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinchwad and hadapsar has the highest number of voters in pune district pune print news psg 17 dpj
First published on: 06-12-2022 at 15:30 IST