भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात भाजपाचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता. त्या विधानावरून विरोधकांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीकास्त्र केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संबंधित टीकेबाबत विचारलं असता चित्रा वाघ म्हणाल्या की, रिकामटेकड्या लोकांना काय वादच लागतात. त्यांना काही काम आहे का? मी एवढंच म्हटले की, महिलांना पुरुषांनी ओवाळले, तर ते तुम्हाला नको आहे का? ती चांगली गोष्ट आहे ना, चंद्रकांत दादांनी भाषणात सांगितले की, आम्हाला प्रत्येक वेळी बहिणी ओवाळतात.आमचं अभिष्टचिंतन करतात. आमच्यासाठी यश मागतात. त्यामुळे बंधूंनीही बहिणींसाठी यश मागितलं तर ते कुठे वाईट आहे. माझ्या आजवरच्या कारकीर्दमध्ये पहिल्यांदाच मला पाच पुरुषांनी ओवाळलं आहे. हे दादामुळे झालं असून मी त्यांची ज्योतिबा फुलेंशी तुलना केली नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra wagh reaction on compare chandrakant patil with mahatama phule svk 88 rmm
First published on: 03-02-2023 at 18:58 IST