राज्यात कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. दोन्ही मतदारसंघातील निवडणुका सत्ताधारी आणि विरोधकांनीही प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. कसबा निडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्यावरूनही भाजपामध्ये मोठा वाद पाहायला मिळाला. आज कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी होत असून या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठं विधान केलं आहे. या विधानावरून निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारावर चर्चा सुरू झाली आहे.

कसब्यातून मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणालातरी भाजपानं उमेदवारी द्यावी, अशी भूमिका विरोधकांकडून घेतली गेली होती. टिळक कुटुंबीयांकडूनही तशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, अखेर हेमंत रासनेंना भाजपाने उमेदवारी दिल्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत आला होता. त्यापाठोपाठ मविआनं रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिली. त्यासह भाजपाच्या भूमिकेचा विरोध करत हिंदू महासभेकडून आनंद दवेंनीही उमेदवारी दाखल केली. त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी होताना पाहायला मिळाली.

annual session of china s top political advisory body
सगळे आलबेल असल्याची बतावणी?
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Gudi Padwa 2024 Wishes messages and quotes in Marathi
Gudi Padwa 2024: गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!

“मी पोस्टलमध्ये आघाडीवर म्हणजे विषयच संपला”, रवींद्र धंगेकरांनी सांगितलं विजयाचं गणित!

रवींद्र धंगेकरांचं मोठं विधान

दरम्यान, आज मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासशी बोलताना रवींद्र धंगेकरांनी मोठं विधान केलं आहे. “लोकांनी पैसे घरात ठेवले आणि ह्रदयातला धंगेकर काढून मतदानाला आले. महाविकास आघाडीच्या विजयाची इथून सुरुवात झाली आहे. ती राज्यातही सत्ता घेणार आहे. भाजपाला जनतेनं कात्रजचा घाट दाखवलाय”, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

“माझ्या पत्नीने कालच सांगितलं होतं की…”

पत्नीने कालच आपल्या विजयाची खात्री व्यक्त केल्याचंही धंगेकर यावेळी म्हणाले. “हा लोकशाहीचा विजय आहे. मी सर्वसमावेशक राजकारण केल्यामुळे त्याचं हे चित्र दिसतंय. कालच माझी पत्नी म्हणाली की तुम्हाला आता सगळं अवघड आहे. तुमच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. तुम्हाला खूप काम करायचं आहे”, असं धंगेकर म्हणाले.