शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार

शहरात झालेल्या वेगवगळ्या अपघातात तिघेजण ठार झाले. कोथरूड, पाषाण रस्ता व कसबा पेठेतील लाल महाल चौक येथे हे अपघात झाले.

शहरात झालेल्या वेगवगळ्या अपघातात तिघेजण ठार झाले. कोथरूड, पाषाण रस्ता व कसबा पेठेतील लाल महाल चौक येथे हे अपघात झाले.
कोथरूडमधील आझादनगर येथून शुक्रवारी (११ डिसेंबर ) सकाळी दहा वाजता दुचाकीस्वार छोटालाल तुलसी निशाद (वय ३५ रा.शास्त्रीनगर कोथरूड) हे निघाले होते. त्यावेळी भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार निशाद यांना धडक दिली. निशाद हे जागीच ठार झाले. या प्रकरणी टेम्पोचालक रामदास गुजर (रा. कोथरूड) याच्याविरूद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाषाण रस्त्यावर शनिवारी (१२ डिसेंबर) दुचाकीस्वार किरण विष्णू कोरे (वय ५५ रा. आळंदी रस्ता) यांना भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. दरम्यान , कसबा पेठेतील लाल महाल चौकात शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास भरधाव दुचाकी पीएमपीएल बसवर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण ठार झाला. रोहित म्लिंद धाडवे (वय २२ रा. दापोडी ) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बसचालक मानसिंग ताटे (वय ५५ रा. थेरगाव) यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. दुचाकीस्वार मोमीन खान (वय २० रा. दापोडी) याने या संदर्भात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार खान व त्याचा मित्र धाडवे हे भरधाव निघाले होते. नियंत्रण सुटल्याने दुचाकी बसवर आदळली. खान हा फेकला गेला, तर त्याचा मित्र धाडवे हा चाकाखाली सापडून ठार झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: City accident 3 death