scorecardresearch

Premium

‘सिटी टास्क फोर्स’ कागदावरच, राज्य शासनाकडून महापालिकेला स्मरणपत्र

राज्य शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या समान पाणीपुरठा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सिटी टास्क फोर्स स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या आदेशाला महापालिकेने केराची टोपली दाखविली आहे.

City Task Force pune
‘सिटी टास्क फोर्स’ कागदावरच, राज्य शासनाकडून महापालिकेला स्मरणपत्र (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

पुणे : राज्य शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या समान पाणीपुरठा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सिटी टास्क फोर्स स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या आदेशाला महापालिकेने केराची टोपली दाखविली आहे. राज्य शासनाच्या आदेशानंतरही सिटी टास्क फोर्स स्थापन न झाल्याने राज्य शासनाने महापालिकेला स्मरणपत्र पाठविले आहे.

सर्व शहरातील घरांना नळ जोडणी देऊन पाणीपुरवठ्याबाबत १०० टक्के स्वयंपूर्ण करणे हे अमृत अभियान योजनेचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. शासनाच्या आदेशानुसार अमृत २.० अभियानाअंतर्गत समान पाणीपुरवठा योजनेसाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आले असून, शहर पातळीवरीही टास्क फोर्स स्थापन करणे बंधनकारक आहे.

ubt Leaders continue to hold corner meetings despite prohibitory orders
ठाण्यात महाविकास आघाडी आणि पोलिस संघर्ष वाढण्याची चिन्हे; ठाकरे गटाच्या चौकसभांना पोलिसांकडून मनाई
Kalyan Dombivli Municipality retain employees job fake caste certificate
कल्याण: बनावट जात दाखल्यांद्वारे कंत्राटी कामगार पालिका सेवेत कायम; राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार
spardha pariksha samanvay samiti
“मस्तवाल सरकारला आपण सर्व रस्त्यावर उतरल्याशिवाय…”, कंत्राटी भरती, पेपरफुटीवरून राजकीय वातावरण तापले
India Committee Meeting sharad pawar house
‘इंडिया’ आघाडीची भोपाळमध्ये पहिली सभा; समन्वय समिती बैठकीत जागावाटपाच्या प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय

हेही वाचा – पोलिसांचे ‘कानावर हात’

हेही वाचा – सणासुदीच्या काळातील ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पुणेकर एकवटले, ऑनलाइन मोहिमेला आतापर्यंत पाच हजारांहून अधिक पुणेकरांचा पाठिंबा

राज्य शासनाच्या सूचनेनंतरही महापालिकेने टास्क फोर्सची स्थापना न केल्याने मार्च महिन्यात महापालिकेकडे पत्राद्वारे विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने राज्य शासनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून, समिती स्थापन करण्यासंदर्भातील स्मरणपत्र महापालिकेला पाठविण्यात आले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: City task force only on paper a reminder to the pune mnc from the state government pune print news apk 13 ssb

First published on: 03-10-2023 at 15:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×