पुणे : तळजाई वसाहतीमध्ये दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी दुपारी हाणामारी झाली. हाणामारीत दहाजण जखमी झाले असून, याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तळजाई वसाहतीत दोन गटांत गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहेत. या वसाहतीत दोन महिन्यांपूर्वी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. गुुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत वाद झाले. वादातून हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



