मेळघाट सपोर्ट ग्रुपच्या उपक्रमात यंदाही कपडे संकलन

चांगले आणि वापरण्यायोग्य असे कपडे आपल्याकडे पडून असतील तर ते मेळघाटवासीयांसाठी द्या, या आवाहनाला पुणेकरांनी गेल्यावर्षी जो भरभरून प्रतिसाद दिला त्यातून मेळघाटातील शेकडो कुटुंबांना चांगले कपडे तर वापरायला मिळालेच, शिवाय तेथील महिलांना चांगला रोजगारही मिळाला आहे. या उपक्रमाचा महिलांना थेट आर्थिक लाभ होत आहे. उपक्रमाची उपयुक्तता लक्षात घेऊन यंदाही असाच उपक्रम पुण्यात पुढच्या महिन्यात १२ ते १४ मे असे तीन दिवस आयोजित करण्यात आला आहे.

Anant Ambani and Radhika Marchant pri Wedding
Video : जामनगरमध्ये व्हीआयपी पाहुण्यांसाठी अंबानी कुटुंबाने उभारले आलिशान तंबू, आतील सोयी बघून तुम्हीही व्हाल थक्क
expensive mandap in pm modi rally in yavatmal
मोदींच्या कार्यक्रमासाठी १३ कोटींचा सभामंडप! निविदा प्रक्रिया न राबविताच कामाला मंजुरी
pune, Dandekar Bridge, Bindumadhav Thackeray, Construction, Grade Separator, Flyover,
पुणे : दांडेकर पूल, बिंदू माधव ठाकरे चौकात होणार ग्रेड सेपरेटर – उड्डाणपूल
pune municipal corporation, Lahuji Vastad Salve, Memorial, Announces, maharashtra government, Sangamwadi,
पुणे : लहूजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूमीपूजनाची घोषणा

मेळघाटातील बांधवांना सक्षम करण्यासाठी, त्यांना स्वयंपूर्ण आणि स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ‘संपूर्ण बांबू केंद्र’ या संस्थेच्या माध्यमातून सुनील आणि निरुपमा देशपांडे हे दाम्पत्य गेली तेवीस वर्षे काम करत आहे. संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठीही बचतगटांच्या माध्यमातून अनेकविध उपक्रम चालवले जात आहेत.

देशपांडे यांच्या संस्थेला आणि त्यांच्या कामांना आपणही काही साहाय्य करावे या उद्देशाने पुण्यातील काही मंडळींनी एकत्र येत मेळघाट सपोर्ट ग्रुप नावाचा गट स्थापन केला असून या गटाच्या माध्यमातून गेल्यावर्षी पुणेकरांना चांगले, वापरण्यायोग्य कपडे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि तीन दिवसात दोन ट्रक भरून कपडे गोळा झाले. गोळा झालेले हे कपडे मेळघाटात पाठवल्यानंतर ते तेथील गरजूंना वापरण्यासाठी देण्यात आले तसेच जे कपडे उरले त्याचाही उपयोग वेगळ्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती मेळघाट सपोर्ट ग्रुपचे मिलिंद लिमये यांनी दिली.

या उपक्रमात गोळा झालेले जे कपडे उरले त्यापासून कापडी पिशव्या आणि रजया तयार करण्याचा नवा उपक्रम संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातूनच चालवला जात आहे. पिशव्या, रजया तयार करण्याचे शिक्षण काही महिलांना देण्यात आले असून त्यामुळे त्यांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. या कामासाठी लागणारी शिलाई यंत्रही त्या महिलांना घेऊन देण्यात आली आहेत.

संस्थेच्या वतीने बांबूच्या विविध वस्तू तयार केल्या जातात. तसेच अनेक ठिकाणी वस्तूंची प्रदर्शने भरवली जातात आणि या वस्तूंची विक्री केली जाते. त्या प्रदर्शनात पिशव्या, रजयाही ठेवल्या जातात. या उत्पादनातून सात-आठ जणी आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाल्या आहेत.

मेळघाट सपोर्ट ग्रुपतर्फे कपडे संकलनाचा उपक्रम यंदाही आयोजित करण्यात आला असून १२ ते १४ मे असे तीन दिवस कपडे संकलनाचे काम चालणार आहे. कर्वे रस्त्यावरील गरवारे प्रशालेत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत कपडे नेऊन देता येतील. तसेच संकलित झालेल्या कपडय़ांची वाहतूक करण्यासाठी लागणारा आर्थिक भार हलका करण्यासाठी साहाय्य करण्याचे आवाहन मेळघाट सपोर्ट ग्रुपने केले आहे. गेल्या वर्षी पुण्यात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला तसाच तो यंदाही मिळेल, अशीही खात्री लिमये यांनी व्यक्त केली.