पुण्यातील कल्याणीनगर भागात मागील महिन्यात पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. दरम्यान, या घटनेतील पीडित परिवाराने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणातील पीडित परिवाराने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, या प्रकरणाच्या एकूण तपासाबाबत चर्चा झाली. तसेच मुख्यमंत्र्यांनी या परिवाराचे सांत्वनही केले. हा अपघात दुर्देवी असून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याचे तसेच पीडित परिवाराला न्याय देण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
rumor, Vishal Agarwal absconding, pimpri chinchwad police, porsche car accident
विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार? पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला खूलासा…
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
Rohit Sharma abused Rishabh Pant and badly scolds for Dropped Easy Catch of Mitchell Marsh Video Viral
ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल
Nitishkumar
“…म्हणून नितीश कुमारांनी पंतप्रधान मोदींकडे महत्त्वाची खाती मागितली नाही”; प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण!
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
ghatkopar hoarding case
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद निलंबित

हेही वाचा – “मी शांत बसणार नाही, सगळ्यांना उघडं पाडेन”, पोर्श कार अपघात प्रकरणी आरोपीच्या नमुन्यात फेरफार करणाऱ्या डॉक्टरची धमकी!

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच या आरोपीच्या वडिलांना, आजोबांना तसेच आरोपीच्या आईला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, हा जामीन एका गुन्ह्यात झाला असल्यामुळे आणि इतर दोन गुन्हे दाखल असल्यामुळे आरोपीच्या वडीलांची सुटका करण्यात आली नव्हती.

खरं तर या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक माहिती समोर येत गेली होती. हा अपघात घडल्यानंतर पोर्श या गाडीतील ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप झाला होता. तसेच या अपघातानंतर आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती.

हेही वाचा – PHOTOS : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात आतापर्यंत काय घडलंय? वाचा संपूर्ण माहिती

या अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. तसंच मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता. तर अश्विनी कोस्टा त्याची मैत्रीण होती. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. मित्रांसह डिनरला गेले होते. हे दोघे बाईकवरुन निघाले त्यानंतर काही सेकंदातच भरधाव वेगात आलेल्या पोर्शने या दोघांना धडक दिली. ज्यात या दोघांचा मृत्यू झाला होता.