scorecardresearch

पुण्यात दरकपातीनंतर सीएनजी ८७ रुपये किलो

दरकपातीमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात सीएनजीचा दर बुधवारपासून (१७ ऑगस्ट) ८७ रुपये किलो होणार आहे.

पुण्यात दरकपातीनंतर सीएनजी ८७ रुपये किलो
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : दरकपातीमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात सीएनजीचा दर बुधवारपासून (१७ ऑगस्ट) ८७ रुपये किलो होणार आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ३ ऑगस्टला शहरात सीएनजीच्या दराने नव्वदी पार केली होती. त्यामुळे दर ९१ रुपयांवर पोहोचले होते.
गेल्या तीन महिन्यांपासून सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत होती. ३ ऑगस्टला शेवटची दरवाढ किलोमागे सहा रुपयांची झाली होती. त्यामुळे सीएनजीचा दर एकदमच ९१ रुपयांवर पोहोचला होता. याबाबत नागरिकांकडून प्रचंड रोष व्यक्त केला जात होता. सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षा चालकांना भाड्यामध्ये वाढ देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. मात्र, त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार रुपयांच्या दरकपातीनंतर पुणे शहरात बुधवारपासून सीएनजी ८७ रुपये किलो दराने उपलब्ध होणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या