शिवाजीनगर मधील भव्य दगडी इमारत, त्याच्या लक्षवेधक कमानी, खिडक्या आणि दारांचे रेखीव काम, उंच मनोरा आणि इमारती समोरची सुबक बाग.. अशी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची इमारत समृद्ध ऐतिहासिक वारश्याची साक्ष देत उभी आहे. या इमारतीला मंगळवारी दीडशे वर्षे पूर्ण झाली.
अभियांत्रिकी महाविद्यालयासाठीच या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. ‘व्हिक्टोरिअन-गॉथिक’ शैलीतील ही इमारत ५ ऑगस्ट १८६५ मध्ये पूर्ण झाली. स्थापत्यशैलीचा वैशिष्टय़पूर्ण नमूना म्हणून या इमारतीची ओळख आहे. तत्कालीन गव्हर्नर बार्टर फ्रेर यांच्या हस्ते या इमारतीची कोनशीला बसवण्यात आली. ब्रिटिश स्थापत्यकार डब्ल्यू. एस. हॉवर्ड यांनी या इमारतीची रचना केली होती. ६० फूट उंचीचा भव्य मनोरा, मोठी सभागृहे, आकर्षक कमानी, मोकळी मोठी गच्ची याबरोबरच इमारतीच्या कोनांवर बसवण्यात आलेली वटवाघळाची दगडी शिल्प ही या इमारतीची वैशिष्टय़े आहेत. महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य थिओडोर कुक यांचा पुतळाही लक्ष वेधून घेतो.
ही इमारत अतिमहत्त्वाचा ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. २०१२ मध्ये या इमारतीच्या दुरुस्तीचे कामही करण्यात आले आहे. इमारतीला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फुलांनी इमारत सजवण्यात आली होती. त्याचप्रमाणे विद्युत रोषणाईही करण्यात आली होती.
अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांना कला अभ्यासाचीही संधी
‘अभियांत्रिकी किंवा तांत्रिक शाखा आणि कला यांचा काय संबंध,’ अशा समजाला छेद देत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही विविध कला विषयांचे शिक्षण घेण्याची संधी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिली आहे. या कला शिक्षणासाठी श्रेयांक (क्रेडिट पॉईंट) राखून ठेवण्यात आला आहे. संगीत, अभिनय, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, चित्रपट अभ्यास यांसारख्या १४ विषयांचे पर्याय महाविद्यालयाने दिले आहेत. यातील एक विषय विद्यार्थी एका श्रेयांकासाठी निवडू शकतात. यापूर्वीच जीवशास्त्र विषयाचा पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. याशिवाय अभियांत्रिकीचे द्वितीय वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेचे उपसंचालक बी. एन. चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. महाविद्यालयाच्या इमारतीला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

yavatmal, Fire Breaks Out, Gynecology Department, Yavatmal government Medical College, No Casualties Reported, vasantrao naik government Medical College , fire in hospital, fire in yavatmal hospital,
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया गृहास आग, रूग्ण नसल्याने जीवितहानी टळली
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!