लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: प्रियकराशी झालेल्या वादातून महाविद्यालयीन युवतीने त्याच्यावर स्वयंपाक घरातील सुरीने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली. प्रियकराच्या खोलीत अभ्यासासाठी गेलेल्या युवतीचा वाद झाल्यानंतर तिने प्रियकरावर सुरीने वार केले. प्रियकराशी झालेल्या झटापटीत महाविद्यालयीन युवती जखमी झाली.

Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या

यशवंत मुंडे (वय २२, मूळ रा. लातूर) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. प्रेयसी अनुजा पन्हाळे (वय २१, रा. अहमदनगर) जखमी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत आणि अनुजा वाघोली परिसरातील रायसोनी महाविद्यालयात विदा विज्ञान (डेटा सायन्स) अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. परीक्षा सुरू असल्याने दोघे एकत्रित अभ्यास करायचे. यशवंत रायसोनी महाविद्यालयाजवळ भाडेतत्वावर खोली घेऊन राहत होता. रविवारी रात्री अनुजा त्याच्या खोलीवर अभ्यास करण्यासाठी गेली होती.

हेही वाचा… पिंपरी: लग्नास नकार दिला म्हणून प्रियकराने प्रेयसीच्या बहिणीला पाठवले न्यूड फोटो

सोमवारी पहाटे यशवंत आणि अनुजा यांच्यात वाद झाला. त्या वेळी तिने स्वयंपाकघरातील भाजी कापण्याच्या सुरीने यशवंतवर सुरीने वार केले. झटापटीत अनुजाला दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या यशवंतला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यशवंत आणि अनुजा यांच्यात प्रेमसंबंध होते. परीक्षा सुरू असल्याने ती यशवंतच्या खोलीवर अभ्यासासाठी गेली होती. त्या वेळी त्यांच्यात वाद झाली. तिने स्वयंपाकघरातील भाजी कापण्याच्या सुरीने त्याच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या यशवंतचा मृत्यू झाला. झटापटीत अनुजा जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. – गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे</strong>