पुणे : मुळशी तालुक्यातील खांबोली तलाव परिसरात मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला गेलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी घडली. तलावात पोहोण्यासाठी उतरल्यानंतर दोघेही गाळामध्ये अडकले. त्यानंतर दोघेजण बुडाले. या घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना बाहेर काढण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा – ऐन दिवाळीत प्रशिक्षण, नवनियुक्त शिक्षकांची नाराजी, काय आहे कारण?

50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
दवाखान्यातील चिठ्ठीमुळे कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटली, आठवड्याभरापूर्वी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
कर्जाला कंटाळून मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या 
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

हेही वाचा – विद्यापीठांच्या धर्तीवर शाळांनाही स्वायत्तता, काय आहे नवी तरतूद?

ओजस आनंद कठापुरकर (वय २२, रा. प्राधिकरण, निगडी), राज संभाजी पाटील (वय २२, रा. अमळनेर जळगाव) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. फर्ग्युसन महावि्द्यालयात पदव्युत्तर पदवी (एम.एससी इलेक्ट्राॅनिक्स) विभागातील विद्यार्थी ओजस कठापुरकर, राज पाटील, तसेच मित्र- मैत्रिणी असे नऊजण रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून खांबोली तलावाजवळ फिरण्यासाठी आले होते. तेथे गेल्यानंतर सर्वजण पाण्यात उतरले. त्यावेळी ओजस आणि राज तलावात साचलेल्या गाळात अडकले. त्यांच्याबरोबर असलेले मित्र पाण्यातून बाहेर पडले. ओजस आणि राज गाळात अडकल्याची माहिती त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ओजसला बाहेर काढले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्थानिक डाॅक्टरांनी सांगितले. गाळ्यात अडकलेल्या राजचा जवानांनी शोध घेतला. त्याला बाहेर काढण्यात आले, अशी माहिती पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.