विद्यार्थी, शिक्षकांच्या कलेचा रंगवेध प्रदर्शनात ३६० चित्रांचा समावेश

करोना काळात घरी असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’तर्फे पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान प्रदर्शन

पुणे :  करोना काळात घरी असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’तर्फे पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांची चित्रे आणि शिक्षकांच्या चित्रांचे ‘रंगवेध’ हे प्रदर्शन आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.  

‘मएसो कलावर्धिनी’च्या अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, महामात्र गोिवद कुलकर्णी, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे या वेळी उपस्थित होते. २२ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर, संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, रवी देव यांच्या उपस्थितीत २४ नोव्हेंबरला पारितोषिक वितरण करण्यात येईल. संस्थेच्या शाळांतून स्पर्धेसाठी आलेल्या १ हजार १०० चित्रांपैकी निवडक ३६० चित्रे प्रदर्शनात मांडली जातील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रदर्शन विनामूल्य पाहता येईल.   रंगवेध हा उपक्रम दरवर्षी राबवला जाईल. तसेच अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्याचा मानस असल्याचे डॉ. मेहंदळे यांनी सांगितले. 

चित्रकला, क्रीडा, संगीत शिक्षकांच्या जागा रिक्त 

 शाळांमधील चित्रकला, क्रीडा आणि संगीत शिक्षकांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या जागा शासनाकडून भरल्या जात नाहीत. त्यामुळे शाळांमध्ये कला, क्रीडा, संगीत शिक्षकांच्या मोठय़ा प्रमाणात रिक्त जागा आहेत. या विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन संस्थेला स्वत:च्या खर्चातून शिक्षकांची नियुक्ती करावी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी या जागा भरणे आवश्यक असल्याचे सहस्रबुद्धे यांनी नमूद केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Colorful exhibition art students teachers ysh

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या