धनादेशावर कंपनी व्यवस्थापनाच्या बनावट स्वाक्षरी करून हिशोब तपासणीसाने (अकाउंटंट) पावणे दोन कोटींची रक्कम स्वतःच्या खात्यावर वळती करून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २ नोव्हेंबर २०२० ते ४ मे २०२३ दरम्यान भोसरी एमआयडीसी येथे घडला. नीलकंठ मच्छिंद्र पाटोले (रा.दिघीरोड, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या हिशोब तपासणीसाचे नाव आहे.

हेही वाचा >>> पिंपरी: वायसीएम रुग्णालयाच्या कचरा कुंडीत सापडले मृत अर्भक; सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू

Pm narendra modi, race course,
पुणे : साडेचार दशकांनंतर रेसकोर्सवर पंतप्रधानांची सभा, भाजपतर्फे नियोजन सुरू, पोलिसांकडूनही स्थळाची पाहणी
Equity mutual fund inflows eased in March
मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ आटला
The central government fiscal deficit reached Rs 15 lakh crore at the end of February
वित्तीय तूट १५ लाख कोटींवर; फेब्रुवारीअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत ८६.५ टक्क्यांवर
sebi introduced t0 settlement plan for share buying and selling from today
शेअर खरेदी-विक्रीची ऐतिहासिक ‘टी प्लस शून्य’ प्रणाली आजपासून; स्टेट बँक, बजाज ऑटोसह २५ समभागांत एकाच दिवसांत व्यवहारपूर्तता शक्य  

याबाबत कंपनीचे कायदेशीर सल्लागार अंकेत प्रदीप जैन (वय ३८, रा. गोरेगाव, मुंबई) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी नीलकंठ हा एमआयडीसीतील एका कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होता. फिर्यादी कंपनीचे कायदेशीर सल्लागार आहेत. आरोपी नीलकंठ याने धनादेशावर कंपनी व्यवस्थापनाची स्वाक्षरी घेतली नाही. कंपनीचे बनावट लेझर बनविले. शिक्के तयार करून लेझरवर मारले. धनादेशावर कंपनी व्यवस्थापनाच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या. त्या धनादेशाद्वारे स्वतःच्या बँक खात्यात एक कोटी ८४ लाख ४४ हजार ५०० रुपयांची रक्कम वळवून अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.