चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत वंचितचा पाठिंबा मिळावा यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे आणि बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. राहुल कलाटे यांच्या पाठोपाठ आता नाना काटे यांनी देखील वंचितचा पाठिंबा मिळावा म्हणून त्यांना पत्राद्वारे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामुळे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर कोणाला पाठिंबा देणार यावरून चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा- पुणे : वकील तरुणीचा विनयभंग प्रकरणी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
What Satej Patil Said?
सतेज पाटील यांचा हल्लाबोल, “भाजपा देशपातळीवर २१४ जागांच्या वर जात नाही, कार्यकर्त्यांना गाजर..”
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लागली असून तिहेरी लढत पाहायला मिळत आहे. भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडी चे नाना उर्फ विठ्ठल काटे यांच्यासाठी चाळीस स्टार प्रचारकांची फौज असून बंडखोर राहुल कलाटे मात्र यात मागे दिसत आहेत. म्हणूनच त्यांनी दोन दिवसांपूर्वी वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना पत्राद्वारे पाठिंबा देण्याबाबत विनंती केली होती. आता महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी देखील प्रस्थाव पाठवला असून यावरून दोघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

हेही वाचा- भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; भूमिपूजनासाठी महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माती नेणार

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडर यांची शिवसनेसोबत युती झालेली आहे. उमेदवार राहुल कलाटे हे शिवसेनेशी संलग्न असून ते बंडखोर उमेदवार आहेत. त्यांच्यावर अद्याप ही शिवसेनेने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे वंचित कोणाला पाठिंबा देते हे पहाणे महत्वाचे आहे. २०१९ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. तेव्हा, वंचित ने पाठिंबा देत प्रकाश आंबेडकर यांनी कलाटे यांचा प्रचार केला होता. आता पुन्हा ते राहुल कलाटें चा विचार करणार की नाना उर्फ विठ्ठल काटें च्या प्रचारात दिसणार हे बघावं लागेल.