निवडणूक प्रतिज्ञापत्रात तफावत ; एकनाथ शिंदे यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार

शिंदे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.

शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे (संग्रहित छायाचित्र)

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील तफावतींबाबत शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात खासगी तक्रार दाखल करण्यात आली. शिवाजीनगर न्यायालयातील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अभिजित खेडकर व डॉ. अभिषेक हरिदास यांनी ॲड. समीर शेख यांच्या मार्फत तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक सुनावणीनंतर ही तक्रार ठाणे येथील न्यायालयात वर्ग करण्यात येईल.

शिंदे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्या वेळी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्र सादर केले होते. प्रतिज्ञापत्रात त्यांच्या शिक्षणाच्या नोंदीसह मालमत्तेच्या तपशिलात तफावत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. भारतीय दंड विधान कलम ९९, २००, लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५ अ अंतर्गत न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Complaint against eknath shinde in pune court over election affidavits pune print news zws

Next Story
हद्दीबाहेरील वढू गावातील १२५ मतदारांचा शहरातील टिंगरेनगर-संजय पार्क प्रभागात समावेश ? भाजपचा आरोप
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी