शरद पोंक्षे यांच्या विरोधात तक्रार; डेक्कन पोलीस ठाण्यात काँग्रेसकडून तक्रार अर्ज

वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या विरोधात प्रदेश काँग्रेस समितीच्या सोशल मिडीया आणि सहकार विभागाकडून मंगळवारी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

शरद पोंक्षे यांच्या विरोधात तक्रार; डेक्कन पोलीस ठाण्यात काँग्रेसकडून तक्रार अर्ज
अभिनेते शरद पोंक्षे

पुणे : वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या विरोधात प्रदेश काँग्रेस समितीच्या सोशल मिडीया आणि सहकार विभागाकडून मंगळवारी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोंक्षे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

डोंबिवली येथे झालेल्या एका कार्यक्रमात शरद पोंक्षे यांनी वादग्रस्त विधान केले होते. पोंक्षे यांनी स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. पोंक्षे यांच्या विरोधात मंगळवारी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला. पोंक्षे यांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे डेक्कन पोलिसांकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गरवारे महाविद्यालय ते डेक्कन मेट्रो स्थानक आणि फुगेवाडी ते दापोडी दरम्यान मेट्रोची चाचणी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी