लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मेट्रोकडून सुरू असलेल्या कामांची पुर्तता वेगाने करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. येत्या तीन महिन्यात मेट्रोची कामे पुर्ण करण्याची सूचना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी आयोजित बैठकीत मेट्रो प्रशासनाला दिल्या.

L&T, Subramaniam , 90 hours work ,
काम महत्त्वाचेच, पण जगणे अधिक महत्त्वाचे…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sub Registrar Office, Registration , Devendra Fadnavis,
कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Image of FASTag logo
राज्यातील सर्व वाहनांना एक एप्रिलपासून FasTag बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय
BKC to Worli phase , metro mumbai ,
शंभर दिवसांत बीकेसी ते वरळी टप्पा वाहतूक सेवेत दाखल करा, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
Metro Project, Devendra Fadnavis, Metro Project Works,
मेट्रो प्रकल्प कामांचे वेळापत्रक करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
Thane District Planning Committee meeting, Thane,
ठाणे : जिल्हा “नियोजन समिती बैठकीच्या” प्रतीक्षेत, पालकमंत्र्यांच्या अभावी बैठकीला मुहूर्त नाही
cet dates will change due to schedule revised cbse class 12 exams
सीईटीच्या तारखांमध्ये बदल होणार; सीबीएसई पेपर असल्याने वेळापत्रकात सुधारणा

पोलीस, तसेच मेट्रोतील अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी पार पडली. यावेळी मेट्रो अधिकाऱ्यांसह, वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. गणेशखिंड रस्त्यावर रेंजहिल्स कोपरा परिसरात शिवाजीनगर- हिंजवडी मेट्रो मार्गिका खांबाच्या उभारणीसाठी २९ ऑगस्ट २०२३ पासून वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालकांसह रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

आणखी वाचा- नवी पेठेतील बंगल्यातून पाच लाखांचे दागिने चोरीला

वाहतूक कोंडीमुळे पोलिसांना रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर मेट्रोचे कामे वेगाने पूर्ण करा, अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बैठकीत दिल्या. मेट्रोने कामे त्वरीत पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader