दहा श्रेयांकांसाठी साडेचारशे तासांचे कार्यप्रशिक्षण, मार्गदर्शक सुचनांचा मसुदा जाहीर 

पुणे : देशभरातील विद्यापीठांतील पदवीपूर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना आता संशोधन कार्यप्रशिक्षण (रीसर्च इंटर्नशीप) सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील रोजगारक्षमता आणि संशोधनवृत्ती वाढवण्यासाठी हा प्रयोग राबवण्यात येत असून, विद्यार्थ्यांना दहा श्रेयांकांसाठी साडेचारशे तासांचे संशोधन प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. 

Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
How Much Expenditure on Salary of Retired Contract Teachers
सेवानिवृत्त निवृत्त कंत्राटी शिक्षकांच्या मानधनावर किती खर्च? जाणून घ्या सविस्तर…

 नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात संशोधन आणि कार्यप्रशिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यानुसार पदवी अभ्यासक्रमांची नवी रचना यूजीसीने जाहीर केली आहे. त्यात संशोधन कार्यप्रशिक्षण समाविष्ट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठीच्या संशोधन कार्यप्रशिक्षणासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचा मसुदा जाहीर करून २५ मेपर्यंत हरकती सुचना मागवण्यात आल्या आहेत. 

संशोधन, नवसंकल्पना आणि तंत्रज्ञान विकासाचा शिक्षणातील समावेश हा आत्मनिर्भर भारताचा पाया आहे. पदवीपूर्व स्तरावर संशोधन प्रशिक्षण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्याद्वारे आंतरविद्याशाखीय, बहुविद्याशाखीय संशोधनाला आणि नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये प्राधान्य दिल्यानुसार संशोधनाची संस्कृती निर्माण होण्यास चालना मिळेल, असे यूजीसीने नमूद केले आहे. मार्गदर्शक सूचनांमध्ये यूजीसीकडून १० श्रेयांकांचा संशोधन क्षमता वृद्धी अभ्यासक्रम (रीसर्च अ‍ॅबिलिटी एन्हान्समेंट कोर्स) प्रस्तावित करण्यात आला आहे. चार वर्षांच्या अभ्यासक्रमात सातव्या सत्रात या अभ्यासक्रमाचा समावेश असेल. विद्यार्थ्यांचे आंतरविद्याशाखीय, बहुविद्याशाखीय संशोधन प्रबंध प्रकल्प स्वरूपात असणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

संशोधन कार्यप्रशिक्षणातील महत्त्वाचे घटक

* ठरावीक कालावधीचा संशोधन प्रकल्प

* संशोधन संस्था, औद्योगिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय संस्था किंवा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांकडे प्रत्यक्ष काम

* आठ ते दहा आठवडय़ांच्या कार्यप्रशिक्षणासाठी १० श्रेयांक

* एक श्रेयांक म्हणजे ४५ तास या नुसार साडे चारशे तासांचे कार्यप्रशिक्षण पूर्ण करण्याचे बंधन

* विद्यार्थ्यांच्या कार्यप्रशिक्षणावर महाविद्यालय-विद्यापीठातील संशोधन शिक्षकाकडून देखरेख

* कार्यप्रशिक्षणाचा अहवाल सादर करण्याचे बंधन

कार्यप्रशिक्षण संकेतस्थळ 

विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षण उपलब्ध होण्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती केली जाईल. त्यावर कार्यप्रशिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांकडून विद्यार्थ्यांची पात्रता दिली जाईल. तर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या कार्यप्रशिक्षणाची संधी शोधणे सोयीचे ठरेल. विद्यार्थी स्वत: किंवा शिकत असलेल्या संस्थेतील शिक्षकांमार्फत कार्यप्रशिक्षणाची संधी शोधू शकेल.