scorecardresearch

पुणे : औंधमध्ये पत्नी आणि मुलाचा खून करुन संगणक अभियंत्याची आत्महत्या

दोघांचे चेहरे प्लास्टिक पिशवीने आवळल्याने त्यांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

computer engineer commits suicide
प्रातिनिधिक छायाचित्र ( Image – लोकसत्ता टीम )

पुणे : पत्नी आणि मुलाचा खून करुन संगणक अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औंध परिसरात घडली. सुदीप्तो गांगुली (वय ४४, रा. डीपी रस्ता, ओैंध) असे आत्महत्या केलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. सुदीप्तोने पत्नी आणि मुलाचा खून करुन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. सुदीप्तोचा ‌भाऊ बंगळुरूमधील एका माहिती-तंत्रत्रान कंपनीत कामाला आहे.

हेही वाचा >>> पुणे : बारामती तालुक्यातील खांडज गावात गोबरगॅसच्या टाकीत पडून चौघांचा मृत्यू

मंगळवारी त्याने सुदीप्तोच्या मोबााइल क्रमांकावर संपर्क साधला होता. त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याने सुदीप्तोच्या पत्नीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सुदीप्तोच्या भावाला संशय आला. सुदीप्तो, त्याची पत्नी, मुलगा प्रतिसाद देत नसल्याने भावाने तिघे जण बेपत्ता असल्याची तक्रार मंगळवारी रात्री चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दिली. सुदीप्तोच्या भावाचा मित्र पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने तक्रार नोंदविली होती. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांचे पथक ओैंधमधील सुदीप्तोच्या घरी पोहोचले. तेव्हा सुदीप्तोची पत्नी आणि मुलगा बेशुद्धावस्थेत पडले होते. सुदीप्तोने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सुदीप्तोची पत्नी आणि मुलाचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. दोघांचे चेहरे प्लास्टिक पिशवीने आवळल्याने त्यांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 16:55 IST