Premium

“पुण्यातील काँग्रेस भवन म्हणजे…”, सोशल मीडियावरील पोस्टनंतर भाजप-काँग्रेसमध्ये राडा

काँग्रेस भवनाचे छायाचित्र समाजामाध्यमातून प्रसारित करून काँग्रेस भवनाचा उल्लेख ‘राजवाडा’ असा करत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला डिवचल्याचे संतप्त पडसाद काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उमटले.

congress bhavan
पुण्यातील काँग्रेस भवन

पुणे : काँग्रेस भवनाचे छायाचित्र समाजामाध्यमातून प्रसारित करून काँग्रेस भवनाचा उल्लेख ‘राजवाडा’ असा करत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला डिवचल्याचे संतप्त पडसाद काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उमटले. काँग्रेस-भाजपमधील समाजमाध्यमातील वाद थेट रस्त्यावर आला. आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखले. मात्र आंदोलन करण्यात येणार नव्हते. काँग्रेस भवनाची माहिती पुस्तिका भाजप पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार होती, असा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. मात्र यामुळे शहरातील राजकीय वातावरण काही काळ गंभीर झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून काँग्रेस भवनाचा उल्लेख राजवाडा करत तसे छायाचित्र समाजमाध्यमातू प्रसिरात करण्यात आले. ऐतिहासिक वास्तूची बदनामी केल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका स्वीकारली. काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस भवनात जमा झाल्यानंतर याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. भवनाचा दरवाजा बंद करून पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाज्यावरून उड्या मारत कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाकडे मोर्चा वळविला.

हेही वाचा >>> पुणे पाठोपाठ आता ‘मावळ’ही आमचे!, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते…

युवक कांग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन, शहराध्यक्ष राहूल शिरसाट, प्रथमेश आबनावे, हनुमंत पवार, संतोष पाटोळे, स्वप्नी नाईक, वहिद नीलगर, परवेज तांबोली, केतन जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन करण्यात येणार नसून केवळ माहिती पुस्तिका देण्यात येणार असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र पोलिसांनी त्याला अटकाव केला, असे अक्षय जैन यांनी सांगितले. भाजप कार्यकालयापुढेही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे शहरातील वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद संपुष्टात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress bhawan in pune the palace dispute between bjp congress post on social media pune print news apk 13 ysh

First published on: 02-06-2023 at 11:16 IST
Next Story
मुठा नदीपात्रात येणारे सांडपाणी होणार शुद्ध, जाणून घ्या कसे?