scorecardresearch

पुणे: काँग्रेसचा उद्यापासून सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे: काँग्रेसचा उद्यापासून सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी (संग्रहित छायचित्र)

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.सप्ताहाचे यंदा १८ वे वर्ष आहे. या सप्ताहात दि. २ ते ९ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रम होणार असून राज्यातील विविध नेते मार्गदर्शन करणार आहेत.‘एक पाऊल विश्वासाचे’ या उपक्रमाने सप्ताहाचे उद्घाटन माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शुक्रवारी (२ डिसेंबर) सायंकाळी पाच वाजता एस. एम. जोशी सभागृह येथे होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार संग्राम थोपटे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार या वेळी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा >>>पुणे: आखाती देशात गेलेल्या घरेलू कामगारांच्या सुटकेसाठी ‘आप’चे प्रयत्न

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेतील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत आयोजित केले आहे. महाविद्यालयीन ७६ विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्यासाठी ‘सोनिया शक्ती शिष्यवृत्ती’ दिली जाणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे ६ डिसेंबरला ‘राज्यघटनेचे संरक्षण आवश्यक’ विषयावर व्याख्यान होणार आहे. याबरोबरच एड्स नियंत्रण जनजागृतीसाठी देवदासींच्या उपस्थितीत सामुदायिक शपथ आणि चित्र प्रदर्शन बुधवार पेठेतील गुजराती शाळेत ७ डिसेंबरला होणार आहे. ‘गाथा रयतेच्या राजाची’ हा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम शहरात विविध भागात सादर केला जाणार आहे. याशिवाय सफाई कर्मचाऱ्यांना विनामूल्य साडी वाटप, तृतीय पंथीयांशी संवाद आणि सन्मान, सुकन्या समृद्धी योजना कार्ड वाटप, महाआरोग्य तपासणी शिबिर, स्त्री-पुरुष समानता विषयावर चर्चा, आईला सुटी हा गृहिणींसाठी अभिनव उपक्रम, बॉक्सिंग स्पर्धा, महिलांसाठी रोजगार मेळावा, महिला पत्रकारांसाठी पूना रुग्णालयात विनामूल्य आरोग्य शिबिर असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत, अशी माहिती सप्ताहाचे मुख्य संयोजक मोहन जोशी यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 12:23 IST

संबंधित बातम्या