लक्ष्य २०१७’ साठी शनिवारी प्रदेशाध्यक्षांची बैठक

पिंपरीत राष्ट्रवादीप्रमाणेच काँग्रेसही फुटीच्या उंबरठय़ावर असून, काही नगरसेवकांनी पक्षातून बाहेर पडण्याची पूर्ण तयारी केली आहे. पक्षातील संभाव्य पडझड रोखण्याचा अखेर प्रयत्न आणि आगामी निवडणुकांची तयारी, यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी (१६ जुलै) शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक लावली आहे.

िपपरी पालिकेत काँग्रेसचे संख्याबळ १४ होते. दोन वर्षांपूर्वी पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक गौतम चाबुकस्वार यांनी विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेच्या तिकिटावर आमदारही झाले. अलीकडेच आरती चोंधे या नगरसेविकेच्या पतीने भाजपमध्ये प्रवेश केला. एक नगरसेवक आमदार महेश लांडगे यांच्यासमवेत जाण्याच्या तयारीत आहे. उर्वरित बारापैकी पाच ते सहा नगरसेवकांचा गट राष्ट्रवादीत जाण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. योग्य वेळी या नगरसेवकांचा प्रवेश होईल, असे सूतोवाच अजित पवार यांनी यापूर्वीच केले आहे. काँग्रेसचे चिंचवडला नुकतेच शिबिर झाले, तेव्हा या नगरसेवकांनी दांडी मारली. त्याचे निमित्त होऊन पक्षश्रेष्ठींनी ‘राष्ट्रवादीचे एजंट हाकलून द्या’, अशा कडक शब्दांत त्यांची हजेरी घेतली. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यावर विश्वास असल्याचे सांगून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा करू, असा साळसूद पवित्रा त्यांनी घेतला आहे. शनिवारी अशोक चव्हाण शहरात येत असून, त्यांच्या उपस्थितीत हॉटेल कलासागरला पक्षातील प्रमुखांची बैठक होत आहे. आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा ते घेणार आहेत. त्याच वेळी पक्षातून बाहेर पडणाऱ्या नगरसेवकांबाबत ठोस निर्णय घेण्याचे संकेत आहेत. िपपरीत भाजपने शिवसेनेशी युती करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. काँग्रेसला उद्देशून वेळप्रसंगी समविचारी पक्षांशी आघाडी करू, असे विधान अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीशी युती करायची की नाही, याविषयी प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत चर्चा होणार आहे. एकूणच प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यामुळे काँग्रेसमधील वातावरण ढवळून निघणार आहे.

शनिवारी अशोक चव्हाण शहरात येत असून, त्यांच्या उपस्थितीत हॉटेल कलासागरला पक्षातील प्रमुखांची बैठक होत आहे. आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा ते घेणार आहेत. त्याच वेळी पक्षातून बाहेर पडणाऱ्या नगरसेवकांबाबत ठोस निर्णय घेण्याचे संकेत आहेत.