पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रोहित टिळक यांना शुक्रवारी बलात्कार प्रकरणात २८ जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. रोहित टिळक यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात सोमवारी एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी टिळक यांच्यावर बलात्कार आणि धमकावण्याचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर रोहित टिळक यांना अटक होण्याची शक्यता होती. मात्र, आज अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यामुळे टिळक यांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. या घटनेमुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडाली होती.

दरम्यान, पीडित महिलेने आपल्या तक्रारीत रोहित टिळक यांनी धमकावून आपल्यावर बलात्कार केल्याचे म्हटले होते. यापूर्वी सदर महिलेने टिळक यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याबाबतचे पत्रही त्यांनी पोलिसांना दिले होते. मात्र त्यावेळी आंदोलन केले नाही. या महिलेने पत्रकार परिषद घेऊन स्वत:ची बाजू मांडण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र ही पत्रकार परिषद झाली नाही. त्यामुळे या महिलेवर दबाव असल्याची चर्चाही रंगली होती. दोन वर्षापूर्वी पीडित महिला व टिळक यांची एक कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवत विविध ठिकाणी बलात्कार, मारहाण केली, अशी तक्रारी पीडितेने केली आहे.तसेच पीडित महिला या वकील असून त्या समुपदेशन करतात. दहा ते बारा वर्षांपासून त्या पतीपासून वेगळ्या राहतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेतली होती.

Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Ramdas Athawale
महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा
prakash ambedkar
‘वंचित’ स्वंतंत्र लढणार! लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नागपूरमध्ये ‘या’ उमेदवाराला पाठिंबा