पुण्यातील लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. पुण्यातील लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. परंपरागत काँग्रेसची ती जागा असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगत महाविकास आघाडी म्हणून पुण्यातील लोकसभेची निवडणूक लढू आम्हाला महाविकास आघाडीतील पक्ष सहकार्य करतील अशीच आमची मागणी आहे. बैठकीत तशी आम्ही मागणी करणार आहोत. असे देखील बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “लोकसभा निवडणुका आगामी काळासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत. विधानसभा निवडणूक देखील लागते आहे. महानगरपालिका निवडणूक लागण्याची शक्यता आहे. परंतु, सर्वच पक्षांचे लक्ष हे लोकसभेच्या निवडणुकीकडे आहे. महाविकास आघाडीत कोणाची ताकत जास्त आहे. यापेक्षा पारंपारिक निवडणूक कोण लढलं यावर चर्चा होते. पुण्यातील कसबा निवडणुकीत सर्वांचं सहकार्य झालं. पुण्यातील जागा काँग्रेसने आतापर्यंत लढवलेली आहे. आम्ही सर्व महाविकास आघाडी म्हणून पुण्यातील लोकसभा लढऊ. सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे ही आमची मागणी आहे. बैठकीत तशी विनंती आणि करणार आहोत.”




आणखी वाचा-राज्यातील दंगलीबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “सरकारला बदनाम…”
अजित पवारांच्या विधानावर म्हणाले, “चर्चा होत राहतील. परंतु, ज्याचा मतदारसंघ आहे. त्यानं ही जागा लढवावी. आम्ही आमच्या दाव्यावर ठाम आहोत. पुण्यातील जागाही पारंपारिक दृष्ट्या काँग्रेसची आहे. काँग्रेस लढत आलेली आहे आणि आताही पुण्यातील लोकसभेची जागा आम्हाला हवी आहे. पुढे ते म्हणाले, ज्या ठिकाणी आमचे खासदार निवडून येतील अशा जागांसाठी आम्ही आग्रह करणार आहोत.”
शरद पवारांवरील टीकेला बाळासाहेबांचं प्रतिउत्तर!
बाळासाहेब थोरात म्हणाले, “राजकारण खालच्या पातळीला पोहोचलेलं आहे. आम्ही सध्या टीव्ही पाहणं सोडून दिलं. कोणीतरी काहीतरी बोलावं आणि ते जनतेने ऐकावं?. राजकारणी लोक आपली बोलण्याची आचार संहिता पाळणार नसतील तर चॅनेलवाल्यांनी तरी आचार संहिता करावी अशी माझी मागणी आहे. असे स्टेटमेंट असतील तर टीव्हीवाल्यांनी दाखवू नये. कोणी काय बोलावं याला काही लिमिट आहे की नाही? विधानसभेत सर्वात जास्त मी निवडून आलेलो आहे. माझ्या ४० वर्षाच्या राजकारणात असं पाहिलं नव्हतं. एकमेकांचा आदर करण्याची संस्कृती जपली पाहिजे.”