scorecardresearch

उत्तर प्रदेशातील भाजपच् नेत्यांच्या प्रचार सभेत हल्ल्याचा कट ; एटीएसच्या दोषारोपपत्रात माहिती

एटीएसकडून नुकतेच संशयित दहशतवाद्यांच्या विरोधात न्यायालयात नुकतेच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

उत्तर प्रदेशातील भाजपच् नेत्यांच्या प्रचार सभेत हल्ल्याचा कट ; एटीएसच्या दोषारोपपत्रात माहिती
( संग्रहित छायचित्र )

पुणे : राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील दापोडी परिसरातून अटक केलेला संशयित दहशतवादी जुनैद आणि त्याचे साथीदार उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभेत दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासात उघड झाली. एटीएसकडून नुकतेच संशयित दहशतवाद्यांच्या विरोधात न्यायालयात नुकतेच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. नरसिंहानंदन सरस्वती, जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिझवी, गायक संदीप आचार्य यांच्यावर हल्ला करण्याचा कट संशयित दहशतवाद्यांनी आखल्याचे माहिती न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात देण्यात आली आहे.

एटीएसने जुनैद मोहम्मद याला दापोडी परिसरातून २४ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर जुनैदचे साथीदार इनामूल हक, युसूफ आणि आफताब हुसेन शाह यांना अटक करण्यात आली होती. जम्मू काश्मिरमधील दहशतवादी संघटनांकडून जुनैद आणि साथीदारांना दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरविण्यात आल्याचे तपासात उघड झाले होते. जुनैद मूळचा बुलढाण्याचा असून तो समाजमाध्यमातून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला होता. जुनैद आणि त्याचे साथीदार दिल्ली आणि उत्तरप्रदेशात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची माहिती एटीएसने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून मिळाली आहे. भाजप नेत्यांच्या प्रचारफेरीत हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या जुनैदला पाकिस्तानातून स्फोटके आणि पैशांचा पुरवठा करण्यात येणार होता. नरसिंहनंदन सरस्वती उत्तरप्रदेशातील हिंदू स्वाभिमान संस्थेचे प्रमुख आहेत. वसीम रिझवी यांनी काही महिन्यांपूर्वी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. गायक संदीप आचार्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रचारक होते.

मराठीतील सर्व पुणे न्यूज ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Conspiracy to attack in bjp leaders campaign meeting in uttar pradesh information in charge sheet of ats pune print news zws

ताज्या बातम्या