पुणे : संशयित आरोपीच्या विरोधात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी पकडले. कोथरुडमधील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.
विजय एकनाथ शिंदे ( वय ४८) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. हवालदार शिंदे कोथरूड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात नियुक्तीस आहेत. याबाबत एका आरोपीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. संशयित आरोपीच्या विरोधात दाखल असलेल्या एका प्रकरणात त्याला हजर करुन घेणे तसेच त्याला जामीन मिळवून देण्यासाठी हवालदार शिंदे यांनी पाच हजारांची लाच मागितली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपीने याबाबत तक्रार नोंदविल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली आणि कोथरुडच्या सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात सापळा लावून शनिवारी सापळा लावण्यात आला. आरोपीकडून लाच घेणाऱ्या शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. शिंदे यांच्या विरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन रात्री उशीरा अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करत आहेत .

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constable arrested taking bribe accused action office assistant commissioner police kothrud pune print news ysh
First published on: 14-08-2022 at 01:48 IST