scorecardresearch

गरवारे मेट्रो स्थानक परिसरातून बांधकाम साहित्य चोरीस

कर्वे रस्त्यावरील गरवारे मेट्रो स्थानकाच्या आवरातून चोरट्यांनी लोखंडी कठडा, पत्रा, छोटे पाईप असा ५० हजार रुपयांचे साहित्यलांबविल्याचा प्रकार उघडकीस आला.

thieves break into 5 shops in one night
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

पुणे : कर्वे रस्त्यावरील गरवारे मेट्रो स्थानकाच्या आवरातून चोरट्यांनी लोखंडी कठडा, पत्रा, छोटे पाईप असा ५० हजार रुपयांचे साहित्यलांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत मेट्रो स्थानकातील सुरक्षारक्षक संदीप कदम (वय ४८, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गरवारे मेट्रो स्थानकाच्या परिसरात लोखंडी कठडा, पत्रा, पाईप असे साहित्य ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी ५० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. गेल्या आठवड्यात गणेशखिंड रस्ता परिसरातून मेट्रोचे साहित्य चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली होती. सहायक फौजदार सय्यद तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 00:52 IST
ताज्या बातम्या