मुंबई- पुणे जुन्या महमार्गावर भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. अनिल भूलेश्वर तिवारी असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे.
मुंबई – पुणे जु्न्या महामार्गावर सोमाटने फाट्याजवळ कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीवरुन जाणाऱ्या अनिल तिवारी यांचा मृत्यू झाला. अनिल तिवारी हे डुडुळगाव येथील खासगी कंपनीत कामाला होते. तळेगाव पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली असून तपास सुरु आहे.
आणखी वाचा