लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : महापालिकेच्या स्थापत्य विभागाची कामे घेण्यासाठी ४० टक्के कमी दराने निविदा भरून रस्ते दुरुस्ती, ‘पेव्हिंग ब्लॉक’ची निकृष्ट कामे करणाऱ्या ११ ठेकेदारांना एका वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. निकृष्ट झालेल्या कामाचे दुप्पट पैसे ठेकेदारांकडून वसूल केले जाणार आहेत.

devendra fadnavis on women complaints
महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलात अत्याधुनिक सुविधा- महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
Aranyaka Kendra of Forest Department is waiting for customers
वन विभागाचे अरण्यक केंद्र ग्राहकांच्या प्रतिक्षेत
Auction vehicles of developer Andheri,
मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव
Mumbai Municipal Corporation will conduct a survey of sanitation workers Mumbai
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे महापालिका सर्वेक्षण करणार; विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन
walchand college of engineering
वालचंद महाविद्यालय बळकाविण्यासाठी अडवणुकीचे सत्र
Constituencies in Nashik Division Delicate'for Grand Alliance
नाशिक विभागातीलं १६ मतदारसंघ महायुतीसाठी ‘नाजूक’ ; भाजपचा अभ्यासातील निष्कर्ष
strike the employees of the motor vehicle department for various demands pune news
‘आरटीओ’तील संपात मध्यस्थ तेजीत! नागरिकांकडून राजरोस जादा पैशांची लूट सुरू; अधिकारी बघ्याच्या भूमिकेत

महापालिकेच्या वतीने विविध विकासकामे केली जातात. स्थापत्य विभागातील रस्तेदुरुस्ती, ‘पेव्हिंग ब्लॉक’, मातीचे ‘जॉगिंग ट्रॅक’ची कामे घेण्यासाठी ११ ठेकेदारांनी ४० ते ४५ टक्के कमी दराने निविदा भरल्या. कमी दर देत १४ विकासकामे घेतली. मात्र, एवढ्या कमी दरात घेतलेल्या कामाचा दर्जा, गुणवत्तेबाबत आयुक्त शेखर सिंह यांना खात्री नव्हती. त्यामुळे त्यांनी ११ ठेकेदारांच्या कामाचा दर्जा तपासण्याचा आदेश दक्षता विभागाला दिले होते. दक्षता विभागाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून (सीओईपी) कामांच्या दर्जाची तपासणी करून घेतली.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीत बुधवारपासून बदल; वाचा कसा असेल बदल?

‘सीओईपी’ने केलेल्या तपासणीत पेव्हिंग ब्लॉक कामात खचलेले ब्लॉक, ज्या ठिकाणी दुरुस्ती आवश्यक अशा ठिकाणी दुरुस्तीच केली नाही. महापालिका मानांकनानुसार काम नाही, रस्ते दुरुस्ती केल्यानंतर त्वरित खड्डे पडणे, काँक्रीट थराची जाडी कमी असणे, जॉगिंग ट्रॅकवर कमी माती टाकणे, निविदेनुसार काम न करणे अशा विविध बाबी समोर आल्या. या अहवालानंतर महापालिकेने निकृष्ट कामे करणाऱ्या ११ ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवून खुलासा मागविला. मात्र, एकाही ठेकेदाराने समाधानकारक खुलासा सादर केला नाही. त्यानंतर ११ ठेकेदारांना एका वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याचा आणि निकृष्ट झालेल्या कामाचा दुप्पट खर्च वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा-संगणक अभियंत्याला बहिष्कृत केल्याप्रकरणी औंधमधील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, न्यायालयाच्या आदेशाने कारवाई

वर्षासाठी काळ्या यादीत

अजय घनश्याम खेमचंदानी, अनिकेत एंटरप्रायजेस, चैताली सप्लायर्स, कविता एंटरप्रायजेस, काव्या असोसिएट्स, मोटवानी ॲण्ड सन्स, नामदे एंटरप्रायजेस, आर. जी. मंगळवेढेकर, रामचंद्र एंटरप्रायजेस, सनसारा कन्स्ट्रक्शन आणि सोहम एंटरप्रायजेस या ११ ठेकेदारांना एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

निकृष्ट कामे करणाऱ्या ११ ठेकेदारांना एका वर्षासाठी काळ्या यादीत टाकले आहे. निकृष्ट झालेल्या कामाचे दुप्पट पैसे वसूल केले जाणार असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.