लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ सन्मान योजनेचा कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार, खासदारांची नावे समाविष्ट केली असताना राज्यसभेचे खासदार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव डावलण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून नवा वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या कृतीचा निषेध करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी होणारा हा कार्यक्रमात वादात सापडण्याची शक्यता आहे.

Prime Minister Narendra Modi Home Minister Amit Shah visit Thane district
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
cost of inauguration ceremony of Metro should be taken from honorarium of cm and Deputy cm says MLA Ravindra Dhangekar
मेट्रोच्या उदघाटन सोहळ्याचा खर्च मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मानधनामधून घेतला पाहिजे : आमदार रवींद्र धंगेकर
Udayanidhi Stalin become deputy chief minister
Udhaynidhi DCM : तमिळनाडूच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल; उदयनिधी यांची उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती, तर तुरुंगातून सुटून आलेल्या नेत्यालाही मंत्रीपदाची माळ!
Amit Shah Nitin Gadkari Deputy Chief Minister Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule lead for Assembly elections 2024 in bjp
तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे
Congress leaders in Nagpur claimed that state president Nana Patole will be the next chief minister
“पुढचा मुख्यमंत्री विदर्भातीलच,” काँग्रेस नेत्यांचा नाना पटोलेंच्या नावावर…
Eknath Shinde Buldhana, Congress leaders Buldhana,
बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात घुसण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न; काळे झेंडे दाखविले
Navi Mumbai Semiconductor Project, Eknath Shinde,
राज्यात आमचेच सरकार असणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारला लाडकी बहीण आठवत आहे, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांची रक्कम जमा केली जाणार असून हा कार्यक्रम शनिवारी पुण्यात होणार आहे. त्यासाठी महायुतीकडून मोठा गाजावाजा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांना देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांची नावे असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव वगळण्यात आले आहे.

आणखी वाचा-“बहिणींनो तुमचा सावत्र भाऊ खोटं…” असं अजित पवार का म्हणाले? कोण आहे सावत्र भाऊ?

पवारांचे नाव वगळल्याची दुसरी घटना

लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामतीमध्ये ‘नमो रोजगार’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळीही शरद पवार यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नव्हते. शरद पवार राज्यसभेचे खासदार असले तरी, त्यांनी निमंत्रण पत्रिकेत नाव टाकू नये असे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले होते. तसेच ते मुंबईतून राज्यसभा खासदार आहे. त्यामुळे त्यांचे नाव टाकण्यात आले नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र त्यावरून मोठा वाद झाल्यानंतर रोजगार मेळाव्याच्या आधी एक दिवस नव्याने निमंत्रण पत्रिका छापत त्यामध्ये शरद पवार यांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते.

शरद पवार हे मुंबई येथील कोट्यातून राज्यसभेचे खासदार असले तरी, लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीमधील काटेवाडी येथून मतदान केले आहे. ज्येष्ठ नेते, खासदार म्हणून त्यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव टाकणे अपेक्षित होते. काटेवाडी येथून मतदान केल्याने ते पुण्यातील कोट्यातून खासदार झाले आहेत, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निमंत्रण पत्रिकेत नाव न टाकल्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली.

आणखी वाचा-आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील २३ हजार ८५० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

राज्याचे माजी मुख्यमंत्री, राज्यातील सर्वांत अनुभवी खासदार असलेल्या शरद पवार यांचे नाव हेतूपुरस्सर वगळण्यात आले आहे. राज्याच्या इतिहासात शरद पवार या नावाशिवाय महिला सबलीकरणाचा इतिहास अपूर्ण आहे. त्यांनी घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयामुळे महिलांच्या आयुष्यात बदल झाले आहेत. महायुती सरकार निमंत्रण पत्रिकेतून पवार यांचे नाव हटवू शकते. मात्र त्यांचे कर्तृत्व मिटवू शकत नाही. -प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

निमंत्रण पत्रिकेत आईचे नाव

निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावात आईचे नाव निमंत्रण पत्रिकेत देण्यात आले आहे. आईचे नाव निमंत्रण पत्रिकेत छापून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अन्य उपस्थितांचे नाव छापतानाही वडिलांबरोबर आईच्या नावाचा उल्लेख आवर्जून करण्यात आला आहे.