पुणे : दशक्रिया विधीसाठीच्या ओंकारेश्वर घाटावर पुन्हा एकदा चोरी झाली असून चांदी, पितळ आणि तांब्याचे तांबे, ताम्हणं आणि तबकं असे पूजा साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. घाटाशेजारीच शनिवार पेठ पोलीस चौकी असताना ही चोरी झाली आहे. गेल्या सव्वा वर्षातील ही दुसरी चोरी असून दशक्रिया विधी होतात त्या ओंकारेश्वर घाटावर सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. दशक्रिया विधी केल्या जाणाऱ्या ओंकारेश्वर घाट येथील खोलीचे शटर उचकटून ही चोरी करण्यात आली आहे. चोरट्यांनी ३० मोठी ताम्हणं, २८ लहान आकाराची ताम्हणं, ३० पळ्या, १२ तांबे, १८ छोटे तबक, १८ लहान आकाराचे शांती तांबे असा ऐवज चोरून नेला आहे.

यापूर्वी २७ एप्रिल रोजी अशाच प्रकारे चोरी झाली होती. प्रशांत मोघे गुरुजी आणि सहकाऱ्यांनी दूरध्वनी करून वैकुंठ परिवारचे संदीप खर्डेकर यांना चोरीची माहिती दिली. या चोरीचा तपास करावा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ओंकारेश्वर घाटाच्या परिसरात सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी खर्डेकर यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ओंकारेश्वर घाटावरील पत्र्यांची दूरवस्था झाली असून तेथून पावसाचे पाणी आत ठिबकत आहे. याचा दशक्रिया विधी करताना त्रास होतो आहे. यासंदर्भात विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयात दोन महिन्यांपासून पाठपुरावा करत आहे. तरी आपण यात लक्ष घालून मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वी पत्रे बदलावेत, अशी मागणी खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार केली आहे.