शहरातील लसीकरण आज बंद

१८ ते ४४ वयोगटाबरोबरच ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण गुरुवारी बंद ठेवण्यात आले आहे.

पुणे : १८ ते ४४ वयोगटाबरोबरच ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण गुरुवारी बंद ठेवण्यात आले आहे. लस टंचाईमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून महापालिके ला लस पुरवठा झाल्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

महापालिके ने १८ ते ४४ वयोगटाबरोबरच ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू के ली आहे. मात्र राज्यात लसटंचाई असल्याने दोन दिवस लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर के ला आहे. महापालिके लाही राज्य शासनाकडून लसीच्या मात्रा उपलब्ध न झाल्याने गुरुवारी लसीकरण होणार नसल्याचे महापालिके च्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. राज्य शासनाकडून लसपुरवठा झाल्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल आणि त्यानुसार के ंद्रांची माहिती जाहीर के ली जाईल, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट के ले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona vaccine corona infection virus pune city ssh