पुण्यातील ‘मायलॅब’कडून चाचणी संचाची निर्मिती

पुणे : भारताला पहिला स्वदेशी ‘आरटीपीसीआर’ करोना चाचणी संच देणाऱ्या मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सने ‘कोव्हिसेल्फ’ या चाचणी संचाची निर्मिती के ली असून त्याला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (आयसीएमआर) मान्यता लाभली आहे. त्यामुळे घरच्या घरी स्वत:ची करोना चाचणी करणे शक्य होणार आहे. चाचणीतून त्वरित निदान होणार असल्यामुळे उशिरा निदानाचा प्रश्नही निकालात निघणार आहे.

मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ म्हणाले, करोना महासाथ हे देशाने पाहिलेले भयंकर संकट आहे. देशाची गरज ओळखून वेळोवेळी आमच्या संशोधनाचा वापर पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही के ला. कोव्हिसेल्फ संचामुळे तातडीने आणि घरच्या घरी करोना चाचणी करणे शक्य आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचा जीव वाचवता येईल.

भारतात हे संच अमेरिके च्या तुलनेत अत्यल्प कि मतीत उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे रावळ यांनी स्पष्ट केले. प्रत्येक संचामध्ये माहितीपत्रक, चाचणीसाठी लागणारे साहित्य आणि संच वापरून चाचणी कशी करावी याबाबतचे सूचनापत्र दिले जाणार आहे. नाकातील द्रवाचा वापर चाचणीसाठी करावा लागेल. १५ मिनिटांमध्ये रुग्णाचे निदान होईल. प्रत्येक संच मोबाइल अ‍ॅप्लिके शनशी जोडलेला असेल, त्यामुळे वापरकत्र्याने भरलेली माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला उपलब्ध होईल.

संपूर्ण स्वदेशी… हा चाचणी संच संपूर्ण भारतीय बनावटीचा आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे लक्षणे असलेले रुग्ण आणि त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्ती या संचाचा वापर घरच्या घरी चाचणी करण्यासाठी करू शकतात. या प्रक्रियेत बाहेरून येणाऱ्या आरोग्य सेवकाने रुग्णाचा वैद्यकीय नमुना घेण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे यंत्रणेवरील ताणही हलका होण्यास मदत होणार आहे.

अल्प किमतीत…  डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवायही स्थानिक औषध दुकानातून तसेच ऑनलाइन पद्धतीने हा चाचणी संच खरेदी करणे शक्य आहे. भारतात या संचाची किं मत २५० रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे. लवकरात लवकर हे संच विक्रीसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सचे सुजित जैन यांनी दिली.