अविनाश कवठेकर
पुणे: प्रभागातील काही ठिकाणी अपुरा आणि विस्कळीत पाणीपुरवठा होतो म्हणून प्रशासनाला धारेवर धरणारे नगरसेवकच समन्यायी पद्धतीने पाणी वितरणासाठी हाती घेतलेल्या समान पाणीपुरवठा योजनेत मोठा अडसर ठरत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेअंतर्गत जलमापके  बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यामुळे अनधिकृत नळजोड उघड होणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत नळजोड घेतलेल्यांना चुचकारण्यासाठी नगरसेवकांकडून जलमापक बसविण्यास विरोध सुरू झाला आहे. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजनेतही अनधिकृत नळजोडांना अभय मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

शहरात अनेक ठिकाणच्या सोसायटय़ांना बेकायदा नळजोड देण्यात आले आहेत. राजकीय वरदहस्ताने बेकायदा नळजोड बसविण्यात आले आहेत. तर क्षेत्रीय कार्यालयाकं डूनही काही ठिकाणी परस्पर नळजोड देण्यात आले आहेत. काही सोसायटय़ांनीही त्यांना मंजूर असलेल्या नळजोड वाहिन्या परस्पर बदलल्या आहेत. इमारतीचा बांधकाम नकाशा मान्य करताना जी जलवाहिनी निश्चित करण्यात येते ती कालांतराने काही बांधकाम व्यावसायिकांकडून बदलण्यात येते, असेही प्रकार झाले आहेत. अशा अनधिकृत नळजोडांची संख्या लाखोंच्या घरात आहे. राजकीय वरदहस्ताने घेतलेले अनधिकृत नळजोड यामुळे पुढे येतील आणि त्यांना नियमित करून घेतले जाईल, असा दावा समान पाणीपुरवठा योजनेला मान्यता देताना करण्यात आला होता. मात्र नगरसेवकांनीच जलमापके  बसविण्यास विरोध करून योजनेला खो घालण्याचा प्रकार सुरू के ला आहे. यापूर्वी वडगांवशेरी परिसरात जलमापके  बसविण्यास नागरिकांनी विरोध के ला होता. आता कात्रज आणि धनकवडी भागातील नागरिकांचा विरोध सुरू झाला आहे.

जलमापके  बसविल्यानंतर येणाऱ्या देयकाबाबत अद्यापही संभ्रम असल्याचा मुद्दा पुढे करून मतपेढी जपण्यासाठी नगरसेवकच स्थानिक नागरिकांना विरोध करण्यास भाग पाडत आहेत. जलमापक बसविले तर अनधिकृत नळजोड घेतल्याचे पुढे येईल. दंड भरावा लागेल, असे नगरसेवक नागरिकांना सांगत आहेत. त्यामुळे जलमापक बसविण्यालाही विरोध होत असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. दरम्यान, यापूर्वीही जलमापके  बसविण्यास नागरिकांनी विरोध के ला होता. ठ्ठसध्या काही भागात अडचणी येत आहेत. मात्र नागरिकांना समजावून सांगितले जात आहे. जलमापके  बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता नंदकु मार जगताप यांनी सांगितले.

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत व्यावसायिक आणि निवासी मिळकतींना जलमापक (वॉटर मीटर) बसविण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र जलमापक बसविण्यास विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर जलमापके बसविण्याच्या योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेणारी मालिका.

दीड लाख अनधिकृत नळजोड

शहरात सध्या दीड लाखांपर्यंत बेकायदा नळजोड असल्याचे सांगितले जात आहे. समान पाणीपुरवठा योजनेला मान्यता देताना बेकायदा नळजोडांचे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. शहराचा भौगोलिक विस्तार, झोपडपट्टय़ांमध्ये राजकीय वरदहस्ताने दिलेले बेकायदा नळजोड याचा विचार करता, या प्रकारच्या नळजोडांची संख्या कित्येक पटीने जास्त असणार आहे. योजना पूर्ण झाल्यानंतरही बेकायदा नळजोड घेऊन पाण्याचा मुक्त वापर होणार असल्याचेही निश्चित असून जास्त इंचाच्या वाहिन्या टाकू न पाणी घेण्यात येणार असल्यामुळे काही भागातील पाणीपुरवठय़ावरच त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सर्वाना समान आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा हा दावाही फोल ठरणार आहे.